जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / COVID-19 Vaccine: देशात 5 दिवस पुरेल इतकाच कोरोना लशीचा साठा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांत तुटवडा

COVID-19 Vaccine: देशात 5 दिवस पुरेल इतकाच कोरोना लशीचा साठा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांत तुटवडा

COVID-19 Vaccine: देशात 5 दिवस पुरेल इतकाच कोरोना लशीचा साठा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांत तुटवडा

अलीकडे देशात कोरोना लसीकरणाला (Corona vaccination) वेग देण्यात आला आहे. पण आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात केवळ साडेपाच दिवस पुरेल इतकाच कोरोना लशीचा साठा शिल्लक असल्याचं म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 एप्रिल: भारतात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव (Corona Pandemic) लक्षात घेता, देशात कोरोना लसीकरणाला (Corona vaccination) वेग देण्यात आला आहे. पण आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात साडेपाच दिवस पुरेल इतकाच कोरोना लशीचा साठा शिल्लक असल्याचं म्हटलं आहे. असं असलं तरी पुढील आठवड्यात राज्यांमध्ये कोरोना लशीचे डोस पाठवले जाणार आहेत. अनेक राज्यांनी केंद्राकडे कोरोना लशीची मागणी केली आहे. सध्या देशात 45 वर्षांपुढील सर्वांना कोरोना लस देण्यात येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने, आरोग्या मंत्रालयाच्या आकडेवारीचा हवाला देत म्हटलं आहे की, आंध्रप्रदेश आणि बिहार सारख्या राज्यात केवळ 2 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. ओडिशामध्ये जास्तीत जास्त 4 दिवस पुरेल एवढा कोरोना लशीचा साठा शिल्लक आहे. बहुतांशी राज्यांत हीच परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यांच्या चिंता वाढताना दिसत आहेत. एकीकडे कोरोना विषाचे रुग्ण वाढत असताना, लशीचा तुटवडा जाणवणे चिंतेची बाब आहे. एप्रिल महिन्यात (Vaccination during April 2021) दररोज सरासरी 36 लाख लस वापरल्या जात आहेत. सध्या भारतात सुमारे 2 कोटी लशींचा साठा उपलब्ध आहे. म्हणजेच, पुढील साडेपाच दिवस या लसी पुरतील. आकडेवारीनुसार, पुढील आठवड्यात राज्यांना 2 कोटी 45 ​​लाख लशीच्या मात्रा मिळतील. आरोग्य मंत्रालयाच्या मते, राज्यांशी सल्लामसलत केल्यानंतर दर चार ते आठ दिवसांनी लशीचा नवीन साठा पाठवला जात आहे. काय आहे राज्यांची परिस्थिती आंध्र प्रदेशात सध्या केवळ 1.4 लाख डोस शिल्लक आहेत. म्हणजेच, या लशी पुढील 1-2 दिवसांत संपतील. येथे दररोज सरासरी 1.1 लाख लोकांना लस दिली जात आहे. बिहारमध्ये एकूण 2.6 लाख डोस शिल्लक आहेत. तर याठिकाणी दररोज सरासरी 1.7 लाख लोकांना लशी टोचल्या जात आहेत. तामिळनाडूमध्ये सर्वात चांगली परिस्थिती आहे. याठिकाणी अद्यार 17 लाख लशींचा साठा शिल्लक आहे. शिवाय तामिळनाडूमध्ये दरदिवशी सरासरी फक्त 37 हजार लशींचे डोस दिले जात आहेत. हे वाचा- धक्कादायक! एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना कोरोनाची लागण, सर्वांनी घेतली होती लस महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण सध्या महाराष्ट्रात (Corona Vaccination in Maharashtra) एका दिवसात सर्वाधिक म्हणजेच 3.9 लाख लोकांना लस दिली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 15 लाख लशींचा साठा केवळ 4 दिवस पुरण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात ( 2.5 दिवस), उत्तराखंड (2.9) ओडिशामध्ये (3.2) आणि मध्य प्रदेशात (3.5) दिवस पुरेल इतका कोरोना लशीचा साठा शिल्लक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात