मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

राज्यातील निर्बंध अधिक कडक; किराणा दुकानाच्या वेळांमध्ये झाला मोठा बदल

राज्यातील निर्बंध अधिक कडक; किराणा दुकानाच्या वेळांमध्ये झाला मोठा बदल

सध्या निर्बंध लावले असले तरी कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यात उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.

सध्या निर्बंध लावले असले तरी कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यात उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.

सध्या निर्बंध लावले असले तरी कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यात उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 19 एप्रिल : राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात लॉकडाऊन कडक करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील किराणा दुकानं (Grocery store) मर्यादित वेळे पुरत्याच खुली करता येणार आहेत. सकाळी 7 ते 11 या वेळेत किराणा दुकानं सुरू राहतील (Grocery store times have changed ) असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत ऑक्सिजनच्या मागणीवरही चर्चा झाली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी तात्काळ सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

हे ही वाचा-LOCKDOWN मध्ये liquorची चिंता मिटली;'या' Apps च्या माध्यमातून घरबसल्या करा ऑर्डर

याशिवाय पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर कंपन्या, रिफायनरी उद्योगांमधून अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे बंद स्थितीत आहेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.

First published:

Tags: Corona spread, Maharashtra