तुम्हालाही बोलताना त्रास होतोय का? दुर्लक्ष करू नका, असू शकतं Coronavirus चं लक्षण

तुम्हालाही बोलताना त्रास होतोय का? दुर्लक्ष करू नका, असू शकतं Coronavirus चं लक्षण

WHO नं कोरोनाव्हायरसच्या या नव्या लक्षणाबाबत माहिती दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मे : सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यात त्रास ही कोरोनाव्हायरसची लक्षणं (coronavirus symptoms) आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत डोळे लाल होणे, पायांना जखमा अशी लक्षणंही दिसून आलीत. तर त्यात आणखी एका लक्षणाची भर पडली आहे, ते म्हणजे बोलताना समस्या येणं. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोनाव्हायरसचं हे एक गंभीर लक्षण असल्याचं सांगितलं आहे.

कोरोनाव्हायसरवर मात केलेल्या रुग्णांनी सांगितलं की, त्यांना व्हायरसची लागण झाली तेव्हा नीट बोलता येत नव्हतं. बोलताना समस्या होती. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाव्हायरसची लागण झाल्यास बोलताना जशी समस्या येते, तशीच समस्या चालण्यातही येऊ शकते. अशा परिस्थिती डॉक्टरांकडे जाण गरजेचं आहे. कोरोनाव्हायरसबाबत माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.

हे वाचा - कोविड-19चे सुरुवातीचे नमुने नष्ट केले, आरोग्य अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा

जगभरात सध्या कोरोनाव्हायसचे 46,85,881 रुग्ण आहेत, 3,10,801 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील मृतांचा आकडा 89 हजार पार गेला आहे, तर संक्रमितांची संख्या 14 लाख 30 हजार आहे.

भारतात 24 तासांत 4 हजार 900 नवीन रुग्ण

देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 4 हजार 987 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत देशभरात कोरोनाचा आकडा 90 हजार 927 वर पोहोचला आहे. त्यापैकी 53, 946 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत 34, 109 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मत दिली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत 2 हजार 872 जणांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा - बारामतीत कोरोनावर उपचार करणार राज्यातलं तालुका पातळीवरील पहिलं रुग्णालय

सर्व सामान्य नागरिकांपासून ते सैन्य दलापर्यंत कोरोना व्हायरसचा धोका आता सगळीकडे जाणवत असल्यानं प्रशासनाकडून वारंवार काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. आतापर्यंतची ही 24 तासांतील सर्वात मोठी वाढ असल्याची चर्चा आहे. 24 तासांत 4 हजार 900 हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

संपादन - प्रिया लाड

First published: May 17, 2020, 12:59 PM IST

ताज्या बातम्या