Home /News /coronavirus-latest-news /

Spanish Flu Return: शास्त्रज्ञांनी दिला गंभीर इशारा, कोरोनानंतर आणखी मोठं संकट

Spanish Flu Return: शास्त्रज्ञांनी दिला गंभीर इशारा, कोरोनानंतर आणखी मोठं संकट

१०० वर्षांपूर्वी जगात धुमाकूळ घातलेला स्पॅनिश फ्लू पुन्हा येऊ (Spanish Flu Return)शकतो, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवली आहे. स्पॅनिश फ्लूमुळे ५ कोटी लोकांना जीव गमवावा लागला होता.

    नवी दिल्ली ०४ मार्च : जवळपास वर्षभरापूर्वी झालेल्या कोरोनाचा नवा स्ट्रेन (New Strain of Corona Virus) आढळून आल्यानं या आजारासोबतच्या लढ्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. सध्या सुरू असलेल्या लसीकरणाचा हा आजार रोखण्यात कितपत उपयोग होईल आणि याचा प्रसार नेमका कधी संपेल, याबद्दल अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे. काही अभ्यासांती असं समोर आलं आहे, की आगामी संसर्ग हंगामी स्वरुपाचा (Seasonal Flu) असू शकतो. जगाच्या काही भागांमध्ये वर्षातून एकदा त्याचा प्रसार होऊ शकतो, असं टाइम्स नाऊच्या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे. अशात आता १०० वर्षांपूर्वी जगात धुमाकूळ घातलेला स्पॅनिश फ्लू पुन्हा येऊ (Spanish Flu Return) शकतो, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवली आहे. स्पॅनिश फ्लूमुळे ५ कोटी लोकांना जीव गमवावा लागला होता. कोरोनानंतर लोकांचा रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमी झाली आहे. तसंच भविष्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याचा इशाराही Dr McCauley यांनी दिला आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि नियमित हात धुण्याच्या सवयीमुळे कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. याधीही आपण स्पॅनिश फ्लूसारख्या (Spanish Flu) आजाराचा सामना केला आहे. यात ५० दशलक्ष लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. असाच आजार पुन्हा एकदा येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. आपण अशा आजारांचा सामना करण्यासाठी तयार राहायला हवं, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पुढे येणारा आजार हा व्हायरस किंवा एखादा फ्लू असू शकतो. हा फ्लू आणि व्हायरस काय करू शकतो, याचा अनुभन आपण घेतला आहे. त्यामुळे, हे फ्लू कधीच जात नसतात, ते नेहमी कोणत्या ना कोणत्या रुपात माघारी येत असतात, असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. स्पॅनिश फ्लू पुढील महामारीचं कारण ठरू शकतं, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ तज्ज्ञांनी सांगितलं आहे. स्पॅनिश फ्लूचं रुपांतर विषाणूमध्ये झाल्यास हाहाकार उडेल. कारण यामुळे तो अधिक घातक होईल, अशी माहिती डब्ल्यूएचओचे 'ग्लोबल इंफ्लुएंजा सर्व्हिलान्स एँड रिस्पॉन्स सिस्टम'चे वरिष्ठ सदस्य असलेल्या डॉ. जॉन मॅककॉली यांनी दिली. कोरोना संकटानंतर जगासमोर हंगामी विषाणूंचा धोका असेल. त्यावेळी हे विषाणू अधिक धोकादायक स्वरूप धारण करतील, असा धोक्याचा इशारा डॉ. मॅककॉली यांनी दिला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona spread, Covid19, Health, Serious diseases, Spanish flu, Virus, Wellness

    पुढील बातम्या