मुंबई 29 एप्रिल: कोरोना (corona)विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्स पाळणंयावर भर देण्यात आलाय. एका कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्यानंतर अनेकांना कोरोनाची लागण होते. आपण सोशल डिस्टन्स पाळण्याचा प्रयत्न करतो. मात्र,गर्दीच्या ठिकाणी ते शक्य होत नाही. हीच अडचण ओळखून मेरठमधील एका विद्यार्थ्यानं एक खास ब्रेसलेट बनवलंय. हे ब्रेसलेट सोशल डिस्टन्सचं पालन करण्यासाठी मदत करू शकतं असा दावा त्यानं केलं आहे.
आज तकनं दिलेल्या वृत्तानुसार या तरुणाचं नाव नीरज उपाध्याय असं आहे. हे ब्रेसलेट घालून आरामात सोशल डिस्टन्सचं पालन केलं जाऊ शकतं, असा दावा या तरुणानं केलाय. हे ब्रेसलेट घातलेल्या दोन व्यक्ती जेव्हा ठराविक अंतरापेक्षा जास्त एकमेकांच्या जवळ जातील, तेव्हा त्यांना करंट म्हणजेच विजेचा झटका लागेल. हा झटका लागल्यानंतर ते आपोआप एकमेकांपासून दूर होतील आणि सोशल डिस्टन्स पाळू लागतील. मात्र,जेव्हा जास्त लोक याब्रेसलेटचा वापर करतील तेव्हाच हे काम करेल आणि लोकांना ते हातात घालूनठेवावं लागेल.
मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण बंद
नीरजने त्याच्या एका मित्राच्या मदतीनेयाचा डेमो प्रदर्शित केलाय. हे दोघे जेव्हा तीन मीटर अंतरापेक्षा जास्त जवळआले तेव्हा त्यांना विजेचा करंट बसला. नीरजला या खास डिव्हाईसचं पेटंटकरवून घ्यायचंय. हे ब्रेसलेट तयार करण्यासाठी त्याला 130 रुपयांचा खर्च आलाय.मात्र,याचं उत्पादन वाढवायचं असल्यास किंमत आणखी कमी होईल,असं नीरजसांगतो. नीरजची कल्पना चांगली आहे. मात्र,त्याचा वापर कितपत होतोय,हेपाहणं महत्वाचं ठरेल.
भारतात रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 3293 रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे, दैनंदिन रुग्णसंख्याही पुन्हा एकदा वाढली असून गेल्या 24 तासांत 3 लाख 60 हजार 960 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona hotspot, Social distancing