नवी दिल्ली, 09 मार्च : भारताची कोरोनाविरोधातील (Corona vaccination) लढाई आता अधिक मजबूत झाली आहे. या लढाईत महत्त्वपूर्व शस्त्र असलेल्या कोरोना लशीच्या (Corona vaccine) यादीत आता आणखी एका लशीचा समावेश झाला आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या (Serum Institute of India) कोवोव्हॅक्सला (Covovax) मंजुरी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे या लशीचं 2 ते 11 वयोगटातील मुलांवरही ट्रायल सुरू आहे आणि लवकरच हे ट्रायल पूर्ण होणार आहे. त्यानंतर लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्गही लवकरच मोकळा होण्याची आशा आहे.
Covovax Nanoparticle NVX-CoV2373 ही अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी फर्म Novavax द्वारे विकसित केलेली प्रोटीन-आधारित लस आहे. त्याचा भारतातील सीरम इन्स्टिट्यूटशी करार आहे. भारतात ते Covovax या ब्रँड नावानं ओळखलं जातं. ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.
हे वाचा - Panic Day: पॅनिक अटॅक म्हणजे नेमकं काय असतं? या कारणांमुळे तो कोणालाही येऊ शकतो
डीसीजीआयने (DCGI) कोवोवॅक्स लशीच्या आपात्कालीन वापरला परवानगी दिली आहे. प्रौढ व्यक्ती आणि 12 पेक्षा जास्त वयाच्या मुलांना ही लस दिली जाणार आहे. त्यामुळे 12-18 वयोगटातील म्हणजे किशोरवयीन मुलांसाठी आता आणखी एका लशीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
Serum Institute of India's Covovax has been granted Emergency Use Authorisation by DCGI for adults & for children above the age of 12. Younger age groups will follow shortly. Novavax in global trials has demonstrated more than 90% efficacy: SII CEO Adar Poonawala pic.twitter.com/TU0ggaWRfK
— ANI (@ANI) March 9, 2022
या लशीचं सध्या 12 वर्षांखालील मुलांवरही ट्रायल सुरू आहे. या लहान मुलांना ही लस कधी दिली जाईल याबाबत लवकरच निर्णय होईल, असं सीरमचे सीईओ आदर पूनावाला यांनी म्हटल्याचं ट्विट एएनआयने केलं आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये सुरू झालं होतं ट्रायल
भारतात या लशीचं लहान मुलांवर फेज 2 आणि फेज 3 चं ट्रायल ऑगस्ट 2021 मध्ये सुरू झालं होतं. या ट्रायलमध्ये एकूण 920 मुले सहभागी आहेत. यात 12 ते 17 वयोगटातील 460 मुले, 7 ते 11 वर्षे वयोगटातील 230 मुले आणि 2 ते 6 वर्षे वयोगटातील 230 बालकांचा समावेश आहे.
सीरम इन्स्टिट्यूटने प्रथम किशोरवयीन मुलांवर कोवोवॅक्सची ट्रायल घेण्याच्या मंजुरीसाठी औषध नियामक संस्थेकडे अर्ज केला होता. किशोरवयीन मुलांवरील सुरक्षिततेच्या सर्व पैलूंची खात्री झाल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटला 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांवर ट्रायल घेण्यास मान्यता देण्यात आली आणि आता 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांवर याची ट्रायल केली जात आहे.
हे वाचा - बापरे! दात घासता घासता फाटला गाल आणि तोंडाबाहेर आला ब्रश; पाहून डॉक्टरही शॉक
या मुलांना Covovax चा पहिला डोस (first dose) आधीच मिळाला आहे. दुसरा डोस 21 दिवसांनी दिला जाईल. कोवोवॅक्सची ट्रायल मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. यानंतर 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोवोवॅक्स लस दिली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Sanjeevani