• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • दोन डोस घेतलेल्या या ज्येष्ठ नागरिकांनी लशीचा तिसरा डोसही घ्यावा; WHO ने दिला सल्ला

दोन डोस घेतलेल्या या ज्येष्ठ नागरिकांनी लशीचा तिसरा डोसही घ्यावा; WHO ने दिला सल्ला

कोरोनाच्या दोन लसी घेतलेल्या काही नागरिकांना तिसरा डोस घेण्याचा सल्ला जागतिक (WHO suggest third dose for senior citizens) आरोग्य संघटनेनं दिला आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 11 ऑक्टोबर : कोरोनाच्या दोन लसी घेतलेल्या काही नागरिकांना तिसरा डोस घेण्याचा सल्ला जागतिक (WHO suggest third dose for senior citizens) आरोग्य संघटनेनं दिला आहे. चीनमध्ये देण्यात येत असलेल्या लसींच्या बाबतीत विशेषत्वानं जागतिक आरोग्य संघटनेनं (Suggestion for two vaccines made in China) हा सल्ला दिला आहे. चीनमधील सायनोवॅक (Sinovac)  आणि सायनोफार्म (Sinopharm) या लसी घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सल्ला देण्यात आला आहे. काय आहे सल्ला? असलेल्या लसींच्या बाबतीत विशेषत्वानं जागतिक आरोग्य संघटनेनं हा सल्ला दिला आहे. चीनमधील सायनोवॅक (Sinovac)  आणि सायनोफार्म (Sinopharm) या लसी चीनमधील अनेक नागरिकांनी घेतलेल्या आहेत. चीनबाहेरीलही काही देशांतील नागरिकांनी या लसी घेतलेल्या आहेत. मात्र या लसींची परिणामकारकता इतर लसींच्या तुलनेत मर्यादित असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांवर त्या ठराविक काळापुरत्याच प्रभावी राहतात आणि लवकरच त्यांचा प्रभाव ओसरत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे इतर आजार असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी या लसीचा तिसरा डोस टोचून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चीनच्या अधिकाऱ्यांनीच दिली होती कबुली काही महिन्यांपूर्वी चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनीच या लसी कमी प्रभावी असल्याचं सांगत सरकारनं यावर काम करण्याचा सल्ला दिला होता. चीनच्या रोग नियंत्रण केंद्राचे संचालक गाओ फू यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरणामुळे नागरिकांना मिळणारं संरक्षण हे मर्यादित असल्याचं म्हटलं होतं. लसीकरण मोहिमेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी वापरण्याबाबत पुनर्विचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. चिनी लस कमी प्रभावी जगातील वेगवेगळ्या देशांत संशोधन करण्यात आलेल्या लसींपैकी चीनमधल्या या दोन लसी कमी प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. त्यात चीनच्याच आरोग्य अधिकाऱ्यांनी या लसींच्या मर्यादित प्रभावाबाबत जाहीरपणे भाष्य केल्यामुळे त्यांच्या जागतिक व्यापारावरही परि्णाम झाला होता. फक्त 100 रुपयांत कोरोना टेस्ट; घरबसल्या अवघ्या 20 सेकंदात मिळणार रिपोर्ट चीनमधील सिनोवॅक आणि सिनोफार्म या लसींचं वितरण आतापर्यंत मेक्सिको, टर्की, इंडोनेशिया, हंगेरी, ब्राझील यासारख्या देशांमध्ये करण्यात आलं आहे. या देशातील ज्या नागरिकांनी चिनी लसींचे डोस घेतले असतील, त्यातील ज्येष्ठ नागरिकांना आता तिसरा डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इतर लसींचा डोसही चालणार चीनमधील सिनोवॅक आि सिनोफार्म यापैकी कुठल्याही लसीचे पहिले डोस ज्यांनी घेतले असतील, त्यांना त्याच लसीचा तिसरा डोस घेणं बंधनकारक नसेल. इतर लसींचा तिसरा डोस घेतला तरी त्यामुळे इम्युनिटी वाढायला मदत होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
  First published: