Home /News /coronavirus-latest-news /

Coronavirus येऊन झालं वर्ष; या दुसऱ्या लाटेनंतर विषाणू संपेल की धोका वाढेल?

Coronavirus येऊन झालं वर्ष; या दुसऱ्या लाटेनंतर विषाणू संपेल की धोका वाढेल?

कोरोना (Coronavirus) जगात येऊन आता एक वर्ष पूर्ण होणार आहे. गेल्या वर्षी चीनच्या वुहानमध्ये (Wuhan) याच महिन्याच्या 17 तारखेला 55 वर्षीय महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले होते.

    नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : कोरोना (Coronavirus) जगात येऊन आता एक वर्ष पूर्ण होणार आहे. गेल्या वर्षी चीनच्या वुहानमध्ये याच महिन्याच्या 17 तारखेला 55 वर्षीय महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. यानंतर हळूहळू कोरोना संपूर्ण जगात पसरला. आतापर्यंत जगभरात 50 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 12 लाख 57 हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 85 लाखांच्या पुढे गेली आहे. यात आतापर्यंत एक लाख 26 हजार 611 लोकांनी आपला जीव गमावला आहे. covid-19 ची दुसरी लाट जगातल्या अनेक देशांमध्ये आली आहे आणि भारतातसुद्धा दिल्ली, केरळ यासारख्या राज्यांत आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जणांना लागण होत आहे. दिल्लीच्या काही भागात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दलही बोलले जात आहे. तसेच जगात फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका हे देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जात आहेत. यामुळे बऱ्याच देशांनी पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोना संपुष्टात येईल की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये हा संसर्ग धोकादायक पातळीवर गेला आहे. ब्रिटनमध्ये शनिवारी उपचारादरम्यान 413 लोकांचा मृत्यू झाला. अमेरिकेत सलग आठव्या दिवशी एक लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. इतर युरोपीय देशांप्रमाणे हा संसर्ग ब्रिटनमध्ये झपाट्याने पसरत आहे. तसेच सरकारने देशातील काही भागात कर्फ्यू लावला आहे. पण त्याचा काही उपयोग झालेला नाही. शनिवारी सुमारे पंचवीस हजारांहून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. दरम्यान त्यात 413 लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांकडून लॉकडाऊन बाबतीत निषेध असून सुद्धा लॉकडाउन संपवण्यात येणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. 'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने कोरोना विषाणू ची दुसरी लाट आणि त्यासोबत येणारा धोक्याचा इशारा याबाबत वृत्त दिले आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेविषयी प्राध्यापक सुनयना गुप्ता म्हणतात, "की जेव्हा एखादा रोग रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात असलेल्या क्षेत्रात प्रवेश करतो तेव्हा ते विनाशाचे कारण बनू शकते. तिथे रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रमाणात असेल तर धोका कमी असतो. हेच झिका विषाणूवरून समजून येतं. त्याचा उद्रेक नुकताच ब्राझीलमध्ये दिसून आला. त्यामध्ये मायक्रोसेफलीचाचा अंश होता आणि तो लोकांचा विषाणूपासून बचाव करत आहे. याचा अर्थ असा नाही की झिका आता गायब झालाय परंतु त्याचे संक्रमण आता कमी दिसू लागले आहे." किती काळ घरात थांबणार? लॉकडाउनमध्ये अडकलेले उद्योगधंदे आणि ठप्प झालेली अर्थव्यवस्था पाहता काही वैज्ञानिकांनी प्रश्न विचारला आहे की विषाणूला घाबरून कधीपर्यंत आपण थांबणार आहोत. ‌त्यात एका शास्त्रज्ञाने असा तर्क लावला की ,उपासमारीची समस्या निर्माण होण्यापूर्वीच कोरोनाविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्याचा विचार केला पाहिजे. परंतु या क्षणी केलेल्या अभ्यासानुसार हे स्पष्ट झालं आहे की कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी हर्ड इम्युनिटी हे एक प्रभावी शस्त्र नाही. यामुळे कुठल्याही देशातील मोठ्या लोकसंख्येला जीविताचा धोका असू शकतो. शास्त्रज्ञांच्या मते जर एखादा रोग लोकसंख्येचा मोठा भागापर्यंत पोहोचला तर उर्वरित लोक त्यापासून सुरक्षित होतात. म्हणजेच माणसाची प्रतिकारक शक्ती त्या लोकांना आजाराशी लढण्यासाठी मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीचे शरीर हे त्या रोगाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सक्षम असते. भारतात कधी येईल हर्ड इम्युनिटी? हर्ड इम्युनिटी मिळण्यासाठी भारत किती दूर आहे? याचं उत्तर देताना प्रोफेसर गुप्ता म्हणतात, संसर्गाची पातळी नैसर्गिकरीत्या कमी होत चालली आहे म्हणून भारतातील बऱ्याच भागात आधीच काही लोक हर्ड इम्युनिटी प्राप्त करू शकले आहेत. असे अनेक अभ्यास समोर आले आहेत त्यांचे म्हणणे आहे की भारतातील काही भागांतील लोकांमध्ये 60-70% अँटीबॉडीज ठिकाणी आढळून आल्या आहेत. हे असे भाग आहेत जिथं सर्वाधिक रिकवरी रेट आहे. covid-19 ची लस सध्या तरी आलेली नाही. म्हणूनच हर्ड इम्युनिटी मिळवण्याचा एक मात्र मार्ग म्हणजे संपूर्ण लोकसंख्याचे 60 ते 70 टक्के लोकांना कोरोना संक्रमित व्हावं लागेल. प्राध्यापक सुनयना गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार "ज्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वांत जास्त आहे तेथे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती अधिक प्रमाणात असणे आवश्यक आहे. स्वीडनबद्दल बोलायला गेलो तर त्यांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही रेस्टॉरंट, शाळा, उद्याने खुली ठेवली. त्यामुळे आता कुठे तरी त्यांची धोक्याची पातळी वाढत चालली आहे. हा रोग संपुष्टात येण्यासाठी शॉर्ट टर्म पद्धतीच्या मार्गाऐवजी प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दीर्घकालीन मार्गाकडे लक्ष दिले पाहिजे". हर्ड इम्युनिटी या आधी तयार झाली होती का? जॉन हॉपकिन्स ब्ल्यूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या म्हणण्यानुसार गोवर, पोलिओ, गालगुंड हे आजार अमेरिकेतून जवळजवळ हद्दपार झाले आहेत.  या रोगांसाठी आता लसीचा मार्फत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणे सहज सोपे झाले आहे. तसेच जिथे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी काही प्रमाणात हे रोग आढळून आलेले आहेत. जरी हे आजार आता प्रौढांमध्ये आढळत नसले तरी मुलांसाठी या आजाराचा धोका काही प्रमाणात निर्माण होऊ शकतो.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Wuhan

    पुढील बातम्या