न्यूयॉर्क, 12 जुलै: सध्या संपूर्ण कोरोना व्हायरससारख्या (Corona Virus) महामारीचा सामना करत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरात कोरोना लसीकरणावर (Corona Vaccination) भर दिला जात आहे. अशातच लसीकरणावरील केलेल्या संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यात लसीकरणाचा दुसरा डोस किती महत्त्वाचा आहे. हे सांगण्यात आलं आहे. फायझर-बायोटेक कोरोना लस घेतल्यानंतर लाळेत (Saliva) मध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीजच्या नवीन अभ्यासानुसार ही नवी माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार (Study) लसीकरण आणि एखाद्या नव्या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शरीरातील अँटीबॉडीज आणि आरोग्याच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ झाली असल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे करण्यात आलेला हा अभ्यास दुसरा डोस घेणं महत्त्वाचं असल्याचं दर्शवतो. हेही वाचा- अखेर नॉट रिचेबल राणेंचा लागला फोन, राज ठाकरे म्हणाले… टॅबिंगन युनिव्हर्सिटीच्या निकोल स्निडरधन-मारा यांच्यासमवेत या टीमने अल्फा आणि बीटा प्रकारांविरूद्ध संरक्षण दिले आहे की नाही याची तपासणी केली. त्यांना तपासात निर्दशनास आलं की, अल्फा व्हेरियंट विरूद्ध अँटीबॉडीज निष्क्रिय करण्यात करण्यात कोणतीही कपात झाली नाही. त्याऐवजी बीटा प्रकाराविरूद्ध अँटीबॉडीज निष्क्रिय करण्यात लक्षणीय घट झाली. युरोपियन काँग्रेस ऑफ क्निनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इंफेक्शियस डिजिजमध्ये सादर केलेल्या अभ्यासात हे दाखवते. या टीमनं वेगवेगळ्या प्रकारच्या लसींनी दिलेली सुरक्षेत कसे बदलले आहे हे पाहण्यासाठी टीमनं प्रथम लसीकरणाद्वारे तयार केलेल्या अँटीबॉडीजचे प्रोफाइल तयार केले आणि नंतर त्यांची तटस्थ क्षमता तपासली. रक्तांमधील अँटीबॉडीजव्यतिरिक्त, त्यांनी पहिल्यांदा लाळेतील अँटीबॉडीजची तपासणी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.