Home /News /ahmednagar /

नगरमध्ये ओमिक्रॉनचा धोका वाढला; हाय रिस्क देशातून 86 प्रवाशी जिल्ह्यात दाखल

नगरमध्ये ओमिक्रॉनचा धोका वाढला; हाय रिस्क देशातून 86 प्रवाशी जिल्ह्यात दाखल

Omicron Variant Cases: गेल्या काही दिवसांत एकूण 156 आंतरराष्ट्रीय प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामध्ये तब्बल 86 प्रवासी ओमिक्रॉनचा उगम झालेल्या देशातून किंवा ओमिक्रॉनचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातून आले आहेत.

    अहमदनगर, 12 डिसेंबर: गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे (Corona virus new variant) महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढली आहे. देशात अनेक राज्यात ओमिक्रॉन विषाणूने (Omicron variant) शिरकाव केला आहे. देशात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (omicron cases in maharashtra) आढळले आहेत. असं असताना आता अहमदनगर ( ahmednagar) जिल्ह्याची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत एकूण 156 आंतरराष्ट्रीय प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामध्ये तब्बल 86 प्रवासी ओमिक्रॉनचा उगम झालेल्या देशातून किंवा ओमिक्रॉनचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातून आले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. शुक्रवारी आणखी 24 प्रवाासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून नगर जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 156 आंतरराष्ट्रीय प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यातील 130 जणांचा शोध घेण्यात आला आहे. पण उर्वरित 26 जणांचा उद्याप शोध सुरू आहे. ओमिक्रॉन संसर्गाच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय प्रवासी गायब झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढताना दिसत आहे. हेही वाचा-Shocking! युवकाने एकाच दिवसात घेतले कोरोना लसीचे 10 डोस; वाचा पुढे काय झालं खरंतर, दक्षिण अफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर, देशभरातील यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रशासनाने भविष्यातील धोका लक्षात घेत आंतरराष्ट्रीय प्रवासावर काही निर्बंध घातले आहेत. तसेच ओमिक्रॉनचा उगम झालेल्या किंवा कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव असणाऱ्या देशांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलं आहे. ओमिक्रॉनच्या हाय रिस्क देशांची यादीही प्रशासानाकडून जारी करण्यात आली होती. हेही वाचा-Omicron रोखण्यासाठी मुंबई मनपा धारावीत राबवणार 'T-4' फॉर्म्युला, वाचा सविस्तर त्यानुसार संबंधित देशातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक केलं आहे. अशात नगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 156 प्रवासी दाखल झाले आहेत. यातील 121 जणांची चाचणी करण्यात आली असून त्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर अद्याप 9 प्रवाशांच्या कोरोना चाचणीचा अहवाल येणं बाकी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar, Corona spread

    पुढील बातम्या