Pfizer च्या रूपाने सर्वात पहिली कोविड लस निर्माण करण्याचं श्रेय या जोडप्याचं! स्वतःच्या लग्नाच्या दिवशीही होते लॅबमध्ये हजर

Pfizer च्या रूपाने सर्वात पहिली कोविड लस निर्माण करण्याचं श्रेय या जोडप्याचं! स्वतःच्या लग्नाच्या दिवशीही होते लॅबमध्ये हजर

फायझरच्या Covid-19 लशीच्या संशोधनाचं नेतृत्व करतं हे शास्रज्ञ जोडपं. जागतिक साथीच्या वेळी लसनिर्मितीचं आव्हान ते कमी वेळात कसं पेलू शकले हे सांगणारी त्यांची जगाला थक्क करणारी गोष्ट.

  • Share this:

न्यूयॉर्क, 18 नोव्हेंबर :  दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. बर्लिनमध्ये सुरू असलेल्या संसर्गजन्य रोगतज्ज्ञांच्या एका परिषदेत गच्च भरलेलेल्या ऑडिटोरियममध्ये डॉ. उगर साहिन बोलत होते. ते म्हणाले,  ‘ जर एखादी जागतिक महासाथ उद्भवली तर त्यांची कंपनी मेंसेंजर RNA तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगाने त्या रोगावरची लस विकसित करू शकेल.’ त्या वेळी BioNTech ही त्यांची कंपनी युरोपातील छोट्या बायोटेक्नॉलॉजी स्टार्टअप विश्वाच्या बाहेर कुणाला माहीत नव्हती. त्या वेळी Coronavirus ची साथ नव्हती आणि Covid-19 हा शब्दही तयार झाला नव्हता. डॉ. उगर साहीन (Dr Ugur Sahin)आणि त्यांची पत्नी डॉ. ओझलेम ट्यूरेसी (Dr. Özlem Türeci) यांनी कॅन्सरवरील संशोधनासाठी सुरू केलेली बायोएनटेक ही कंपनी  आता Covid Vaccine च्या शर्यतीत सर्वप्रथम येण्याची शक्यता आहे. लाखो लोकांचे जीव वाचवणारी लस त्यांच्या कंपनीने निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. कोरोनाची दहशत कमी होण्याच्या दृष्टीने हे मोठं काम हे दांपत्य करत आहे.

गेल्या वर्षी पर्यंत डॉ. उगर यांच्या BioNTech कंपनीनं एकही उत्पादन बाजारात आणलं नव्हतं आणि कोविड-19 अस्तित्वातही आला नव्हता. पण डॉ. उगर यांचे त्या परिषदेतले शब्द खरे ठरले. कोविडची अजिबात लागण न झालेल्या स्वयंसेवकांवर केलेली लशीची चाचणी कोरोना विषाणूला रोखण्यात 90 टक्के यशस्वी ठरल्याचं फायझर Pfizer आणि बायएनटेक या कंपनीने गेल्या आठवड्यात जाहीर केलं. त्यानंतर जगभरात 12 लाख बळी घेणाऱ्या कोरोना विषाणूवर लस तयार करणाऱ्या कंपन्यांच्या स्पर्धेत फायझर आणि डॉ. जोडप्याची बायोएनटेक कंपनी सर्वांत आघाडीवर आली. त्यावेळी डॉ. उगर यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, ‘कोरोना काळाच्या शेवटाची ही नांदी आहे.’ न्यूयॉर्क टाइम्सने या जोडप्याबद्दलचा लेख प्रसिद्ध केला आहे.

अनोखं सेलिब्रेशन

डेविड गेल्स यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखानुसार, लस 90 टक्के यशस्वी झाल्याचं या शास्रज्ञ जोडप्यानी अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. साहिन म्हणाले, ‘मला आणि ओझलेमला रविवारी रात्री लशीच्या परिणामकारकतेचा निकाल कळाला आणि आम्ही घरीच टर्किश चहा पिऊन तो आनंद साजरा केला. आम्ही तो क्षण साजरा केला आम्हाला मोठा दिलासा मिळाला होता.’ उगर आणि ओझलेम दोघे मूळचे तुर्कस्तानचे आहेत. पण त्यांचं शिक्षण आणि काम मात्र जर्मनीत सुरू केलं.

बायोएनटेकची जानेवारीपासून सुरू होती तयारी

साहिन यांनी जानेवारी महिन्यात द लॅन्सेट हे मेडिकल जर्नल वाचल्यावर त्यांच्या लक्षात आलं की चीनमध्ये वेगाने परसरणारा कोरोना विषाणू जगात महामारी आणणार. त्यामुळे जानेवारी 2020 पासूनच त्यांच्या कंपनीतील शास्रज्ञांनी जर्मनीतील मेन्झमध्ये आपल्या सुट्ट्या रद्द करून संशोधन सुरू केलं होतं. या प्रोजेक्टचं नाव होतं ‘प्रोजेक्ट लाइटस्पीड.’

गेल्या महिन्यातील एका मुलाखतीत डॉ. उगर म्हणाले, ‘आम्ही ज्या क्षमतेने आणि स्पर्धात्मक पद्धतीने काम करू शकतो तितकं वेगानी काम करणाऱ्या कंपन्या जगात फारशा नाहीत. त्यामुळे ही संधी नाही तर आमची जबाबदारी बनली कारण मला याची जाणीव झाली होती की जगात पहिल्यांदा कोरोना लस विकसित करणाऱ्यांमध्ये आम्ही असू.’ परिणामकारक लशी तयार झाल्यावर त्यांच्या चाचण्या, परवानग्या हे पूर्ण करण्याची गरज उगर यांना लक्षात आली. 2018 पासून बायोएनटेक आणि फायझर तापावरील लस तयार करण्यासाठी एकत्र काम करत होते. आणि मार्च 2020 मध्ये दोन्ही कंपन्यांनी कोरोना लसीसाठी एकत्र काम करण्यासाठी करार केला. तेव्हापासून साहिन आणि फायझरचे चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अल्बर्ट बोर्ला यांची मैत्री झाली. डॉ. साहिन हे तुर्की आणि बोर्ला हे ग्रीक त्यामुळे मैत्रीला तोही आधार होता.

डॉ. जोडप्याने लग्नानंतरही गाठली होती लॅब

आता 55 वर्षांचे असलेल्या डॉ. उगर यांचा जन्म तुर्कीतल्या इस्केंदेरूनमध्ये झाला. ते चार वर्षांचे असताना त्यांचं कुटुंब जर्मनीतल्या कोलोंजिनमध्ये स्थायिक झालं त्यांचे आईवडिल फोर्डच्या कारखान्यात काम करायचे. त्यांनी कोलोंजिन विद्यापीठातून डॉक्टरीचं शिक्षण पूर्ण केलं आणि 1993 मध्ये त्यांच्या इम्युनोथेरेपी इन ट्युमर सेल्स या संशोधनाबद्दल विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट दिली.

डॉ. ट्युरेसी यांचे वडील मूळचे तुर्कस्तानचे. ते इस्तंबूलमधून येऊन जर्मनीत डॉक्टरीचा व्यवसाय करायचे. ट्युरेसी आता 53 वर्षांच्या असून त्यांचा जन्म जर्मनीतच झाला. सुरुवातीला त्या वैद्यकीय कारकीर्द थांबवून नन होण्याच्या विचारात होत्या. पण वैद्यकीय कारकीर्दीच्या सुरुवातील त्यांची डॉ. उगर यांच्याशी भेट झाली आणि ते लग्नबंधनात अडकले. विशेष म्हणजे लग्न लागल्यावर दोघंही थेट प्रयोगशाळेत गेले आणि संशोधन सुरू केलं. ट्रुसी सध्या बायोएनटेक कंपनीच्या चिफ मेडिकल ऑफिसर आहेत. डॉ. यांनी वैद्यकशास्रात 1996 मध्ये नोबेल पुरस्कार मिळवलेल्या रॉल्फ झिंकेरनाजेल यांच्या लॅबमध्ये काम केलं.

या जोडप्यानी 2001 मध्ये गॅनीमेड फार्मास्युटिकल्स ही कंपनी स्थापन करून कॅन्सरवर औषधं तयार केली होती. काही वर्षांनी त्यांनी बायोएनटेक ही कंपनी स्थापन केली आणि मेसेंजर RNA सह इतर तंत्रज्ञानांचा कॅन्सरवरील उपचारांसाठी उपयोग कसा करता येईल याच्यावर संशोधन केलं. वेसबाडेन कुरियर या स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डॉ. उगर यांनी त्यांना एक मोठी युरोपीय फार्मास्युटिकल कंपनी उभी करायची असल्याचं सांगितलं होतं.

बायोएनटेकला मिळाली आर्थिक मदत

बायोएनटेककंपनीने लाखो डॉलरची आर्थिक मदत मिळवली असून आता कंपनीत 1800 लोक काम करतात आणि बर्लिन, केंब्रिज, मॅसेच्युसेट्स आणि जर्मनीतल्या इतर शहरांतही कंपनीची ऑफिसेस आहेत. गेल्या वर्षी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने कंपनीत 55 मिलियन अमेरिकी डॉलरची गुंतवणूक केली असून, एचआयाव्ही व टीबीवरी संशोधनासाठी ती वापरली जाणार आहे. साहिन यांना 2019 मध्ये इराण सरकारच्या वतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला दिला जाणारा मुस्तफा पुरस्कार देण्यात आला.

जर्मनीतलं सर्वांत श्रीमंत जोडपं वापरतं सायकल

साहिन आणि ट्युरेसी यांनी त्यांची गॅनीमेड कंपनी 2016 मध्ये विकली. गेल्यावर्षी बायोएनटेक कंपनीचे शेअर लोकांना विकण्यात आले. गेल्या काही महिन्यांत या शेअरची किंमत 21 अब्ज अमेरिकी डॉलरहून जास्त झाली होती त्यामुळे हे डॉ. जोडपं जर्मनीतलं सर्वांत श्रीमंत जोडपं ठरलं होतं. पण त्यांच्या ऑफिसजवळच्या एका अपार्टमेंटमध्ये हे नम्र असं डॉ. जोडपं आणि त्यांची मुलगी राहते. ते सायकलनी ऑफिसला जातात त्यांच्याकडे स्वत: ची कारही नाहीए.

फायझरच् चिफ एक्झिक्युटिव्ह बोर्ला म्हणाले, ‘ उगर यांना फक्त विज्ञानाची काळजी आहे. व्यवसायाबद्दल बोलणं हे त्यांचं कामच नाही. त्यांना त्याबद्दल बोललेलं अजिबात आवडत नाही. ते शास्रज्ञ आणि तत्त्व पाळणारे आहेत. माझा त्यांच्यावर 100 टक्के विश्वास आहे.’

जर्मनीतील राजकारणीही आता डॉ. जोडप्याचं कौतुक करायला लागलंय पण या जोडप्याला राजकीय गोष्टींकडे बघण्यासाठीही अजिबात वेळ नाही. बायोएनटेक लस विकसित करण्यात इतकी गुंतली आहे की फायझरशी सहभागी करार करताना त्याच्या आर्थिक बाबी अजून निश्चित झालेल्या नाहीत. याबाबत साहिन म्हणाले,‘ परस्परांबद्दल विश्वास आणि नातं याला अशा व्यवसायात खूप महत्त्व आहे त्यामुळेच आम्ही वेगाने काम करतो आहोत. बऱ्याच गोष्टींबाबत आम्ही केवळ काही अटीबद्दल एकमत केलंय पण आमचं फायनल कॉन्ट्रॅक्टही झालेलं नाही.’

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 18, 2020, 7:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading