नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : जगभरातील कोरोना लशीच्या स्पर्धेत रशियाने (russia) बाजी मारली आहे. रशियाने जगातील पहिली कोरोना लस (russian corona vaccine) तयार केली आहे. Sputnik V असं या लशीला नाव देण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचे सांगितलं. आता या लशीसाठी जगभरातील 20 देशांनी आधीच ऑर्डर देऊन ठेवल्या आहेत. दरम्यान ही रशियन लस भारतातही दिली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. भारताला आतापर्यंत ऑक्सफर्डच्या कोरोना लशीकडून आशा होती. या लशीमध्ये भारताची भागीदारीही आहे. मात्र ही लस सध्या क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे आणि रशियाने आपली कोरोना लस तयार असल्याची आनंदाची बातमी दिली. त्यामुळे या लशीकडे सर्वांचं लक्ष लागलं. “रशियाची ही लस जर यशस्वी ठरली तर ती किती सुरक्षित आणि परिणामकारक आहे हे पाहावं लागेल आणि तसं असेल तर लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची क्षमता भारताकडे आहे”, असं दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.
रशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे. रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांची लस चाचणीत यशस्वी झाली तर ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात उत्पादनही सुरू होईल. हे वाचा - रशियाने बनवली जगातील पहिली कोरोना लस; सुरक्षिततेबाबत WHOने दिली मोठी माहिती मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्युटने अॅडेनोव्हायरसला बेस बनवून ही लस तयार केली आहे. संशोधकांचा असा दावा आहे की या लसीमध्ये वापरलेले पार्टिकल्स स्वत: ची रेप्लिकेट (प्रतिकृती) बनवू शकत नाहीत. मुख्य म्हणजे क्लिनकल ट्रायलदरम्यान संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी या लसीचा स्वत:वर प्रयोग केला होता. ‘या’ देशाला मिळणार पहिली लस रशियाने फिलिपिन्सला (Philippians) त्यांची कोरोना लस देण्याची ऑफर दिली आहे. फिलिपिन्सचे अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते यांनी ही ऑफर मान्य केली आहे, एवढेच नाही तर या लशीचा पहिला डोस ते स्वत: घेणार आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, “जेव्हा ही लस तयार होईल. तेव्हा सर्वात आधी मी माझ्यावर प्रयोग करणार आहे. मला काही हरकत नाही.” दुतेर्ते यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपले आदर्श असल्याचे याआधीच सांगितले होते. या लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये फिलिपिन्सने रशियाला मोठी मदत केली होती. हे वाचा - 102 दिवसांनी न्यूझीलँडमध्ये कोरोनाची पुन्हा एंट्री; लोकल ट्रान्समिशनमुळे चिंता मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं याआधीच या लशीच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. रशियाने कोरोना लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल केलेलं नाही. कोणतीही लस तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल न करताच त्याच्या उत्पादनासाठी परवाना दिला जात असेल तर हे धोकादायक ठरू शकतं, असं WHO च्या प्रवक्त्या क्रिस्ट्रियन लिंडमियर (Christian Lindmeier) यांनी यूएन पत्रकार परिषदेत सांगतिलं होतं.

)







