मॉस्को, 23 ऑगस्ट : एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, कोरोना लशीवरून वादंग सुरूच आहे. याआधी रशिया आणि चीन यांनी लस तयार केल्याचा दावा केला होता, मात्र या लस किती सुरक्षित आहेत, याबाबत अनेक प्रश्न होते. यातच आता रशियाने दुसरी कोरोना लस तयार केली आहे. यापूर्वी 11 ऑगस्ट रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी, रशियाने कोरोना विषाणूची यशस्वी लस तयार केली आहे. असा करणारा रशिया पहिला देश ठरला होता. रशियाने ही पहिली कोरोना लस वापरण्यास परवानगीही दिली होती.
आता रशियाने दुसरी लस तयार केल्याचा दावा केला आहे. डेली मेलच्या अहवालानुसार रशियाचे असे म्हणणे आहे की, या पहिल्या कोरोना लशीचे जे साइड इफेक्ट दिसले होते, ते दुसऱ्या लशीत दिसणार नाही. रशियाने लॉंच केलेल्या पहिल्या लसीचे नाव Sputnik5 ठेवण्यात आले होते. तर, दुसर्या लसीचे नाव EpiVacCorona आहे. रशियाने सायबेरियाच्या वर्ल्ड क्लास व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट (व्हॅक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी) येथे EpiVacCorona लस तयार केली आहे.
वाचा-आनंदाची बातमी! 73 दिवसांत भारतात उपलब्ध होणार कोरोनाची लस
रशियन शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की EpiVacCorona लसीची क्लिनिकल चाचणी सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल, ट्रायल दरम्यान 57 स्वयंसेवकांपैकी एकावरही या लशीचे साइड इफेक्ट दिसले नाही. EpiVacCorona चे दोन डोस लागू केले जातील. पहिल्या डोसच्या 14 ते 21 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. रशियाला आशा आहे की ही लस ऑक्टोबरपर्यंत नोंदविली जाईल आणि नोव्हेंबरपासून त्याचे उत्पादन सुरू होईल.
वाचा-धक्कादायक! फक्त माणसांमध्येच नाही तर भारतात या ठिकाणीही सापडला कोरोना व्हायरस
वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीने कोरोना व्हायरसच्या 13 संभाव्य लशींवर काम केले. प्रयोगशाळेतील प्राण्यांवर या लशींची चाचणी घेण्यात आली. चीन, अमेरिका आणि ब्रिटन देखील कोरोनाची यशस्वी लस तयार करण्यात व्यस्त आहेत आणि सध्या तिन्ही देशांच्या अनेक लसींच्या फेज-3 चाचणी सुरू आहेत.
वाचा-मृत्यूची संख्या पोहोचली 8 लाखांवर; जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 2 कोटींपार
भारतीय लसही होणार उपलब्ध
भारतात 73 दिवसात कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे. ही लस नेमकी कोणती आणि याची किंमत काय आहे याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार कोविशील्ड ही लस 73 दिवसांनी भारतात उपलब्ध होणार आहे. ही लस पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटनं तयार केली आहे. राष्ट्रीय टीकाकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकार ही लस मोफत उपलब्ध करून देण्याबाबत विचार करत आहे. यासंदर्भात सरकारकडून काही उपायोजनावर चर्चा सुरु असल्याचीही माहिती मिळाली आहे.