नवी दिल्ली 28 नोव्हेंबर : विजेच्या वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनने संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं आहे (Coronavirus New Variant Omicron). त्यामुळेच बहुतांश देशांनी दक्षिण आफ्रिकेतून प्रवास तात्काळ स्थगित केला आहे. खरं तर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चेतावणी दिली होती की ‘Omicron’ इतर व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने पसरू शकतो आणि यामुळे पुन्हा संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर हे सावधगिरीचे उपाय केले गेले. ‘ओमिक्रॉन’ हा प्रकार अनेक म्यूटेशनचा परिणाम असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कोविड B.1.1.1.529 चे अधिक संसर्गजन्य स्वरूप पहिल्यांदा 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून WHO ला कळवण्यात आले. यानंतर बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल आणि ब्रिटनमध्येही त्याची ओळख पटली आहे. WHO ने 26 नोव्हेंबर रोजी त्याचे नाव ओमिक्रॉन ठेवलं आणि त्याचं वर्णन ‘चिंताजनक’ स्वरूप (Variant of Concern) असं केले. ‘चिंताजनक स्वरुप’ ही WHO ची कोरोना विषाणूच्या अधिक धोकादायक प्रकारांची सर्वोच्च श्रेणी आहे. कोरोना विषाणूचे डेल्टा प्रकार देखील या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले होते. ज्या देशांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांवर प्रवास निर्बंध लादले त्यात अमेरिका, कॅनडा, यूके यांचा समावेश आहे. अमेरिकेने सांगितलं की ते सोमवारपासून दक्षिण आफ्रिका आणि शेजारील देशांमधून प्रवास प्रतिबंधित करणार आहेत. ब्रिटन, युरोप आणि इतर देशांनी जाहीर केलेल्या उड्डाणांवर बंदी घातल्यानंतर कॅनडाने त्या देशांच्या सीमा देखील बंद करत असल्याचे सांगितले. त्याच पावलावर पाऊल ठेवत भारतातील अनेक राज्यांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांसाठी क्वारंटाईनचे नियमही ठरवले आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, कोरोनाव्हायरसमुळे गेल्या 20 महिन्यांपासून स्थगित केलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे 15 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘जोखमीवर’ मानलेल्या देशांना त्यांच्या प्री-कोविड नियोजित फ्लाइट्सपैकी केवळ काही टक्के फ्लाइट चालवण्याची परवानगी दिली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.