ग्वाल्हेर, 25 एप्रिल : कोरोना संसर्गादरम्यान हाहाकार माजला आहे. दरम्यान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सातत्याने कारनामे करीत असल्याचं समोर आलं आहे. एक दिवसपूर्वी रुग्णालयावर कोविड संसर्ग झालेल्या रुग्णाचे डोळे काढण्याचा आरोप लावण्यात आला आहे. शनिवार पुन्हा एकदा रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना दुसऱ्याचा मृतदेह सोपवण्यात आला. कुटुंबीय स्मशानात अत्योष्टीसाठी मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी करीत होते. मुखाग्नी देण्यासाठी जेव्हा मुलाने वडिलांच्या चेहऱ्यावरुन कपडा हटवला तर त्याला धक्काच बसला. तो मृतदेह त्याच्या वडिलांचा नाही तर दुसऱ्याच व्यक्तीचा होता.
शनिवारी या प्रकरणाचं सत्य कळतात कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. दोन तासांनंतर रुग्णालयाने कुटुंबाकडे रुग्णाचा मृतदेह सोपवला. समाधिया कॉलनीत राहणारे 62 वर्षीय छोटे लाल कुशवाह निवृत्त झाले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल झाले. उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीय जेव्हा रुग्णालयात पोहोचले तेव्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातून त्याच्या वडिलांचा मृतदेह देण्यात आला. कुटुंबीयांना जो मृतदेह सोपवण्यात आला होता तो बांधलेला होता. बाहेर वडिलांच्या नावाचा कागद लावला होता. कुटुंबीय मृतदेह घेऊन मुक्तीधामपर्यंत पोहोचले. स्थानिक प्रशासनाचे अधिकारीही तेथे पोहोचले. मृतदेह उतरून अर्थीवर ठेवण्यात आला. सर्व विधी केल्यानंतर मुलाने वडिलांचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र जेव्हा त्याने वडिलांचा चेहऱ्यावरुन कपडा हटवला, त्याला धक्काच बसला. हा मृतदेह त्याच्या वडिलांचा नव्हता.
हे ही वाचा-महत्त्वाची बातमी! 18 वर्षांवरील व्यक्तींचं walk in vaccination नाही, नोंदणी Must
त्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार रोखण्यासाठी तत्काळ रुग्णालयात पोहोचले. त्यांनी उपस्थित डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना तक्रार केली. हे ऐकून डॉक्टर आणि अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर छोटेलाल मृतदेहाची शोधाशोध सुरू झाली. तब्बल 2 तासांनी त्यांना मृतदेह सापडला आणि कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी मृतदेह सुपूर्द करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Death, Madhya pradesh