मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

महत्त्वाची बातमी! 18 वर्षांवरील व्यक्तींचं walk in vaccination नाही; Cowin वर नोंदणीशिवाय नाही मिळणार लस

महत्त्वाची बातमी! 18 वर्षांवरील व्यक्तींचं walk in vaccination नाही; Cowin वर नोंदणीशिवाय नाही मिळणार लस

Corona vaccination registration: 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस  मिळणार हे खरं, पण त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. 28 तारखेपासून नोंदणी सुरू होणार आहे. कशी करायची, कुठे करायची?

Corona vaccination registration: 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार हे खरं, पण त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. 28 तारखेपासून नोंदणी सुरू होणार आहे. कशी करायची, कुठे करायची?

Corona vaccination registration: 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार हे खरं, पण त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. 28 तारखेपासून नोंदणी सुरू होणार आहे. कशी करायची, कुठे करायची?

नवी दिल्ली, 25 एप्रिल: देशात मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लसीकरण (Corona vaccination 1 march) सुरू झालं. Co-win आणि Arogyasetu या सरकारी अ‍ॅप्सवर नोंदणी करून लसीकरण होईल, असं सांगण्यात आलं असलं तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सेंटरवर थेट लस दिली जात होती. app वर नोंदणी (How to register for corona vaccine) करून झालेल्या लसीकरणापेक्षा अशा walk-in vaccination करणाऱ्यांचीच संख्या मोठी आहे. पण 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी मात्र ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. Co-win किंवा आरोग्यसेतूवर पूर्वनोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळेल, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

एकीकडे लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न होत आहे, पण पुरेसा लशींचा साठा नसल्याने अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परत फिरावं लागत आहे. मुंबई, ठाणे अशा अनेक  शहरांमध्ये पुरेशा लसी नसल्याचं वृत्त आहे. दुसरीकडे देशात कोरोना संकटाचा (Corona Epidemic) प्रसार वेगानं वाढत असतानाच या विषाणूविरोधात लढा देण्यासाठी सरसकट लसीकरण मोहीम (Vaccination for all) उघडण्यात आली आहे.

घरीच कोरोनावर उपचार घेताना शरीरातील Oxygen कमी झाल्यास नेमकं काय करावं? पाहा हा VIDEO

राज्य सरकारनं एक मेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणात 18 वर्षावरील सर्वांनादेखील मोफत लस (Free vaccination) देण्याची घोषणा केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे लसीकरण अधिक वेगानं होण्यास मदत होणार आहे तसंच अधिकाधिक लोकांचा लस देता येणार आहे. पण केंद्राच्या या नव्या नियमामुळे लसीकरण प्रक्रिया एकदम वेगाने होणार नाही.

लसीकरण केंद्रावरची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठीचा हा निर्णय असल्याचं केंद्राच्या सूत्रांनी सांगितलं. एकदम मोठ्या प्रमाणावर लससाठा पुरवणं शक्य नसल्याने टप्प्याटप्प्याने लसीकरण योजना होती. आता 1 मार्चपासून लसीकरण केंद्रावर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता केंद्र सरकारने नोंदणीशिवाय लस नाही, हे स्पष्ट केलं आहे.

कधीपासून सुरू होणार नोंदणी?

भारत सरकारच्या MyGovIndia या ट्विटर हँडलवर सरकारनं ही माहिती दिली आहे. 28 एप्रिलला नोंदणी सुरू होणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. लसीकरणाबाबात इतरही काही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. 1 मे पासून लसीकरण केलं जाणार आहे. त्यासाठी स्वतःच नोंदणी करणं गरजेचं आहे. तसंच 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी अ‍ॅडव्हान्स अपॉइंटमेंट घेता येईल. मात्र कोणालाही जाऊन नोंदणी न करता थेट लसीकरण करून घेता येणार नाही. रजिस्ट्रेशन cowin.gov.in आणि Aarogya Setu अ‍ॅपवर करता येईल अशीही माहिती देण्यात आली आहे.

नोंदणी झाल्यानंतर संबंधित नागरिकांना लसीकरणाबाबत माहिती मिळणार आहे. आपल्या आधार क्रमांकाच्या किंवा इतर ओळखपत्रांच्या आधारे तुम्हाला हे ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करता येईल.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus