नागरिकांना दिलासा; दोन दिवसात उपलब्ध होणार अँटी कोरोना औषधं, DRDO च्या अध्यक्षांची माहिती

नागरिकांना दिलासा; दोन दिवसात उपलब्ध होणार अँटी कोरोना औषधं, DRDO च्या अध्यक्षांची माहिती

ऑक्सिजनचा पुरवठा कमी असला तरी या औषधांनी रुग्णाचा बचाव करणं शक्य होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 मे : देशभरात कोरोनाचा हाहाकार उडाला आहे. अनेक राज्यात तर ऑक्सिजन पुरवठा नसल्यामुळे अनेक रुग्णांचा जीव गेला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.डीआरडीओने कोरोनावर तयार केलेल्या नव्या औषधांच्या आपात्कालिन वापराला परवानगी दिली आहे. 2 डेओक्सी-डी-ग्लुकोज असं या औषधाचं नाव आहे. या औषधांने कोरोना रुग्ण लवकर बरे होतात, असं सांगितलं जात आहे.

या औषधांमुळे बाहेरुन ऑक्सिजन कमी प्रमाणात घेतला तरी चालू शकतो. 11 ते 12 म्हणजे दोन दिवसात हे औषध बाजारात उपलब्ध होईल अशी माहिती समोर आली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष सतिश रेड्डी यांनी असा दावा केला आहे.

हे ही वाचा-Corona लसीकरण केंद्र-उपलब्ध स्लॉट शोधण्यात समस्या? हे 5 प्लॅटफॉर्म करतील मदत

सुरुवातीच्या टप्प्यात या औषधाचे 10 हजार डोस बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र सरसकट या औषधांचे सेवन करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषध घेतलं जावं. या औषधांमुळे ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला 2 ते 3 दिवसात ऑक्सिजन सपोर्टवरुन काढता येऊ शकतं. त्यामुळे लवकरच हे औषध रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल, असंही रेड्डी यांनी सांगितलं. आजपर्यंत तीन वेळा या औषधाच्या मानवी चाचण्या करण्यात आल्याचं डीआरडीओनं सांगितलं. देशातील 11 रुग्णालयांमध्ये 110 कोरोना रुग्णांवर या औषधांच्या दुसऱ्या फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी पार पडल्या आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: May 9, 2021, 5:43 PM IST

ताज्या बातम्या