Home /News /coronavirus-latest-news /

खरंच, Covid-19 ची लागण झाल्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा मृत्यू?

खरंच, Covid-19 ची लागण झाल्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा मृत्यू?

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची कोरोनाची लागण झाल्यानंतर मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. काय आहे सत्य?

    नवी दिल्ली, 7 मे: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची कोरोनाची लागण (Chhota Rajan Dies) झाल्यानंतर मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मात्र ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं जात आहे. छोटा राजनला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. छोटा राजनला तिहार तुरुंगात असताना कोरोनाची लागण झाली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्याचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अनेक दिवस त्याची प्रकृती अस्थित आहे. मात्र तो जिवंत असल्याचे वृत्त आता समोर आलं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एम्स रुग्णालयातून याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. एम्स रुग्णालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. हे ही वाचा-दुर्देवी! औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू तर दुसरीकडे काळ्याबाजाराला ऊत छोटा राजन याच्यावर अपहरण आणि हत्येच्या अनेक प्रकरणांसह 70 हून अधिक केसेस दाखल होते. त्याला मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे हिच्या हत्येत दोषी करार देत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी हनीफ कडावालाच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय कोर्टाने त्याला बरी केली होती. सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तुरुंगात असतानाही अनेक आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: AIIMS, Corona, Corona patient, Covid-19 positive, Delhi, Fake news, India

    पुढील बातम्या