मराठी बातम्या /बातम्या /देश /कोरोनाच्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना संसर्गाचा धोका तीन पटीने कमी, लंडनच्या अभ्यासात माहिती उघड

कोरोनाच्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना संसर्गाचा धोका तीन पटीने कमी, लंडनच्या अभ्यासात माहिती उघड

Corona Vaccination: कोविड -19 संसर्गावरील यूकेच्या सर्वात मोठ्या अभ्यासापैकी एक असलेल्या रिअल टाइम असेसमेंट ऑफ कम्युनिटी ट्रान्समिशन (REACT-1) अभ्यासानुसार ही माहिती उघड झाली आहे.

Corona Vaccination: कोविड -19 संसर्गावरील यूकेच्या सर्वात मोठ्या अभ्यासापैकी एक असलेल्या रिअल टाइम असेसमेंट ऑफ कम्युनिटी ट्रान्समिशन (REACT-1) अभ्यासानुसार ही माहिती उघड झाली आहे.

Corona Vaccination: कोविड -19 संसर्गावरील यूकेच्या सर्वात मोठ्या अभ्यासापैकी एक असलेल्या रिअल टाइम असेसमेंट ऑफ कम्युनिटी ट्रान्समिशन (REACT-1) अभ्यासानुसार ही माहिती उघड झाली आहे.

नवी दिल्ली, 06 ऑगस्ट: कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) लसीकरणाचे (Corona Vaccination) दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्यांचं दोन डोस घेऊन लसीकरण पूर्ण झालं आहे अशा लोकांना कोरोना संसर्गाचा धोका तीन पटीने कमी होतो. लंडनच्या एका अभ्यासातून ही माहिती उघड झाली आहे.

कोविड -19 संसर्गावरील यूकेच्या सर्वात मोठ्या अभ्यासापैकी एक असलेल्या रिअल टाइम असेसमेंट ऑफ कम्युनिटी ट्रान्समिशन (REACT-1) अभ्यासानुसार, इंग्लंडमध्ये संसर्ग गेल्या REACT-1 रिपोर्टनंतर 0.15 टक्क्यांहून 0.63 टक्क्यांपर्यंत चौपट वाढलं. हे 20 मे रोजीपासून 7 जूनपर्यंतच्या कालावधीसाठी होतं. दरम्यान त्याच्या निकालांमध्ये 12 जुलैपासून प्रकरणांमध्ये घट झाली आहे.

इम्पीरियल कॉलेज लंडन आणि इप्सोस मोरी यांनी केलेल्या विश्लेषणात, 24 जून ते 12 जुलै दरम्यान इंग्लंडमधील अभ्यासात सहभागी झालेल्या 98 हजारांहून अधिक वॉलंटियर्स ध्ये असे आढळून आले की, ज्यांनी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे फार कमी लोक एकापासून दुसऱ्याकडे व्हायरस संक्रमित करतात.

रहायचं असेल पावसाळ्यातही निरोगी तर, आहाराची घ्या खास काळजी; या चुका टाळाच

यूकेचे आरोग्य सचिव साजिद जावेद म्हणाले, आमचा लसीकरण कार्यक्रम संरक्षणाची भिंत तयार करत आहे. मात्र आपल्याला सावध राहण्याची गरज आहे कारण आपल्याला या व्हायरसबरोबर जगणं शिकलं पाहिजे.

लसीकरण सुरक्षित आहे

जावेद यांनी सांगितलं की, हा रिपोर्ट वैयक्तिक जबाबदारी घेण्याचं महत्त्व दर्शवत आहे. जर तुम्ही एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलात आणि तुम्हालाही लक्षणे असतील तर तपासणी करा आणि शक्य तितका वेळ मास्कचा वापर करा. मी सर्वांना विनंती करतो की, ज्यांनी अद्याप लसीकरण घेतलं नाही नाही. त्यांनी लसीकरण करुन घ्या. लस ही सुरक्षित आहे आणि ती कार्यरत देखील आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination