पुणे, 17 जून : 21 जूनपासून भारतात 18+ सर्वांसाठी मोफत लसीकरण (Corona vaccination) होणार आहे. त्याआधीच लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लहान मुलांना आता पुण्याच्या सीरमची इन्स्टिट्यूटची (Pune serum institute) नोवोवॅक्स (Novavax) लसही दिली जाणार आहे. भारतात या लशीच्या क्लिनिकल ट्रायलला परवानगी (Novavax Clinical trial on child) देण्यात आली आहे. सध्या भारतात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला लहान मुलांवर ट्रायलसाठी परवानगी देण्यात आली आहे. आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटही लहान मुलांना कोरोना लस देण्याच्या तयारीत आहे. नोवोवॅक्स लशीचं जुलैमध्येच लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल करण्याचा कंपनीचा विचार आहे, असं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.
Serum Institute of India plans to start clinical trials of the Novavax shot for children in July: Sources
— ANI (@ANI) June 17, 2021
अमेरिकेलीत नोवोवॅक्स (Novavax) कंपनीच्या मदतीने सीरम इन्स्टिट्यूने तयार केलेली novavax ही लस. दोन दिवसांपूर्वीच या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम जारी करण्यात आले. Novavax म्हणजेच NVX-CoV2373 कोरोना लस. 29,960 लोकांवर या लशीचं ट्रायल घेण्यात आलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या लशीचा एकूण प्रभाव 90.4 टक्के आहे. तर मध्यम आणि तीव्र आजारापासून संरक्षण देण्यात ही लस 100 टक्के प्रभावी आहे. हे वाचा - Alert! 2-4 आठवड्यांतच महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट; टास्क फोर्सने केलं सावध नोवाव्हॅक्सने सांगितलं, यूएस आणि मेक्सिकोमध्ये या लशीची चाचणी घेण्यात आली. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सपासून ही लस सुरक्षात देते. सर्वात जास्त प्रभावी आहे. प्राथमिक अहवालानुसार ही लस सुरक्षित आहे आणि जवळपास 90% प्रभावी आहे. या लशीचा साठा आणि वाहतूकही सोपी आहे. जगभरात ही लस खूप फायदेशीर ठरणार आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत यूएस, युरोप आणि जगभरातील इतर देशांकडून कंपनी आपल्या लशीसाठी परवानगी मागणार आहे. त्यानंतर महिन्याला या लशीचे 100 दशलक्ष डोस उत्पादिक केले जाणार आहे. हे वाचा - कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास Mucormycosisचा धोका नाही? आपल्या लशीचे बहुतेक डोस मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जातील, असं नोवोवॅक्सचे चीफ एक्झिक्युटिव्ह स्टॅनले इरेक यांनी असोसिएट प्रेसशी बोलताना सांगितलं. दरम्यान भारत या वर्षाच्या अखेरपर्यंत या लशीचे 20 कोटी डोस आणण्याच्या तयारीत आहे.