50 प्रवासी असलेल्या बसचा चालक निघाला Corona पॉझिटिव्ह आणि मग...

50 प्रवासी असलेल्या बसचा चालक निघाला Corona पॉझिटिव्ह आणि मग...

लक्झरी बस चालकालाच कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. हा चालक जी बस चालवत होता त्या बसमध्ये 50 प्रवासी प्रवास करत होते.

  • Share this:

ग्वाल्हेर, 16 एप्रिल: मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर (Gwalior) महामार्गावर कोविड तपासणी पथकाकडून तपासणी सुरू होती. यावेळी अशी काही बातमी आली की ज्यामुळे सर्वांनाच एक धक्का बसला. ग्वाल्हेरच्या दिशेने जाणाऱ्या एका लक्झरी बसच्या (Travels bus) चालकाचाच कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह (Bus driver testes covid positive) आला. हा चालक जी बस चालवत होता त्या बसमध्ये तब्बल 50 प्रवासी प्रवास करत होते. चालकालाच कोरोना झाल्याची माहिती समोर आल्याने बसमधील प्रवाशांना धक्काच बसला.

गुरुवारी ग्वाल्हेर महामार्गावर कोविड मोबाइल युनिट कार्यरत होती. यावेळी शिवपूरी येथून येणाऱ्या एका लक्झरी बसला या पथकाने तांबवलं आणि सर्वांची तपासणी सुरू केली. बसमधील सर्व 51 जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यावेळी बस चालकासोबतच इतरही पाच प्रवाशांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या सर्वांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. या सर्वांना होम आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे.

कोरोना तपासणी नोडलचे अधिकारी डॉ. अमित रघुवंशी यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग मोठ्या वेगाने वाढत आहे. यामुळे शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर मोबाइल युनिटच्या माध्यमातून कोविड टेस्ट करण्यात येत आहे. याच पद्धतीने शिवपूरी येथून येणाऱ्या बसमधील सर्वांची तपासणी करण्यात आली.

वाचा: Corona फोफावतोय! देशातील 3000 पेक्षा जास्त स्मारकं आणि संग्रहालयांना 15 मे पर्यंत टाळं

या तपासणीत हजीरा येथे राहणारा बस चालक कोरोना बाधित असल्याचं समोर आलं. या बसमध्ये क्लिनर नसल्याने बस चालकानेच सर्व प्रवाशांना तिकीट दिली होती. त्यामुळे सर्व प्रवाशांचीही कोविड टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये पाच प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं.

मध्यप्रदेशात कोरोनाची स्थिती काय?

मध्यप्रदेशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गुरुवारी मध्यप्रदेशात कोरोनामुळे 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 10,166 नवी कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने नोंद झालेले रुग्ण आणि मृतकांचा हा एका दिवसातील सर्वाधिक आकडा आहे. मध्यप्रदेशात आतापर्यंत 4365 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर बाधितांची एकूण संख्या 3,74,518 इतकी झाली आहे.

Published by: Sunil Desale
First published: April 16, 2021, 5:34 PM IST

ताज्या बातम्या