मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोना वाढतोय! मास्कच्या वापरामुळे चेहऱ्यावर होतात हे दुष्परिणाम, 'मास्कने'पासून असा करा बचाव

कोरोना वाढतोय! मास्कच्या वापरामुळे चेहऱ्यावर होतात हे दुष्परिणाम, 'मास्कने'पासून असा करा बचाव

X
प्रतिकात्मक

प्रतिकात्मक फोटो

मास्क अधिक काळ वापरल्यामुळे काही लोकांना ‘मास्कने’चा (Maskne) त्रासही होऊ शकतो. मास्कनेपासून बचाव करण्यासाठी काय करायचं, याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली 28 मार्च : देशातील कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. यामुळे गेले काही महिने बाजूला ठेवलेले मास्क आता लोक पुन्हा वापरू लागले आहेत. एच3 एन2 विषाणू (H3N2) आणि कोरोना विषाणू (Covid-19) अशा दुहेरी हल्ल्यापासून वाचण्यासाठी मास्क वापरणं अगदी गरजेचं आहे. मात्र मास्क अधिक काळ वापरल्यामुळे काही लोकांना ‘मास्कने’चा (Maskne) त्रासही होऊ शकतो. मास्कनेपासून बचाव करण्यासाठी काय करायचं, याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. बेंगळुरूमधील ॲस्टर सीएमआय रुग्णालयातील मेडिकल आणि कॉस्मेटिक डर्मेटॉलॉजी विभागातील डॉ. शिरीन फर्टाडो यांनी याबाबत माहिती दिली आहे.

  मास्कने म्हणजे काय?

  तुम्हाला चेहऱ्यावर होणाऱ्या ॲक्नेबद्दल कदाचित माहिती असेल. चेहऱ्यावर एखाद्या ठिकाणी चट्टे, पिंपल्स किंवा रॅशेस येणे म्हणजे ॲक्ने. मास्कने (What is Maskne) हा याचाच एक प्रकार. मात्र, हे रॅशेस किंवा ॲक्ने मास्कच्या अती वापराने येतात. तसं तर सर्जिकल मास्क हा केवळ एकदाच वापरून फेकून द्यायचा असतो. मात्र, कित्येक लोक पुन्हा पुन्हा एकाच मास्कचा (Mask) वापर करतात. आपल्या चेहऱ्यावरील मास्क हा हवेतील बॅक्टेरिया अडवून ठेवण्याचे काम करतो. एकच मास्क बराच वेळ चेहऱ्यावर ठेवल्यामुळे, किंवा पुन्हा पुन्हा वापरल्यामुळे हे बॅक्टेरिया चेहऱ्यावरील त्वचेच्या संपर्कात येऊ शकतात. यामुळेच चेहऱ्यावरील त्वचेला (Skin Care Tips) इजा पोहोचू शकते.

   कोरोना पुन्हा चिंता वाढवणार! ऑक्टोबर 2022 नंतर शनिवारी पहिल्यांदाच इतक्या रुग्णांची नोंद

  या सोबतच, कित्येक लोक सिंथेटिक कापडाचे मास्क वापरतात. मास्कचे कापड चेहऱ्याच्या नाजूक त्वचेवर पुन्हा पुन्हा घासले गेल्यानेदेखील चेहऱ्यावर मास्कने (Acne on Face) येऊ शकतात.

  मास्कने कसे टाळाल?

  खाली दिलेल्या टिप्स वापरून तुम्ही मास्कनेपासून स्वतःचा बचाव करू शकता

  प्रत्येक वापरानंतर मास्क बदला – मास्कने टाळण्यासाठी (Avoid Acne tips) सर्वांत सोपा उपाय म्हणजे नेहमी स्वच्छ मास्क वापरणं. दिवसातून वेळोवेळी डिस्पोजेबल मास्क बदलल्यास चेहऱ्यावर धूळ किंवा बॅक्टेरिया साचण्याची भीती राहत नाही. जर तुम्ही कापडी किंवा फॅब्रिक मास्क वापरत असाल, तर दररोज ते मास्क धुतल्याने तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा सुरक्षित राहू शकते.

  चेहरा वारंवार धुवा – तुमचा चेहरा स्वच्छ असल्यास ॲक्ने होण्याची शक्यता अगदी कमी होते. त्यामुळे दिवसातून कमीतकमी दोन वेळा चेहरा स्वच्छ धुणं गरजेचं आहे. तुमच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक ऑईल जपण्यासाठी सॅलिसिलिक ॲसिड (Salicylic Acid) असणारे क्लिंझर वापरणं फायद्याचं ठरतं.

  पिंपल्सना हात लावणं टाळा – चेहऱ्यावरील रॅशेस किंवा पिंपल्स ज्या ठिकाणी असतात, त्या ठिकाणी वारंवार खाजवण्याची इच्छा होणं साहजिक आहे. मात्र, तसं करणं टाळावं. वारंवार चेहऱ्याला हात लावल्यामुळे तुम्ही तुमच्या हातावरील बॅक्टेरिया आणि धूळ चेहऱ्यावर लावता. तसंच, पिंपल्स किंवा ॲक्ने खाजवल्यामुळे ते बरे होण्याच्या प्रक्रियेतही अडथळा येतो, आणि ते वाढू शकतात. तेव्हा ॲक्ने टाळण्यासाठी तुमचा हात पिंपल्सपासून दूर ठेवणंच उत्तम.

  ॲक्ने पॅचचा वापर करा – पिंपल्स किंवा ॲक्ने बाहेरच्या वातावरणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी हायड्रोकोलॉईड पॅचेस (Hydrocolloid Patches) वापरणं फायद्याचं ठरतं. यामुळे धूळ, विषाणू आणि अगदी तुमच्या हातांपासूनही चेहऱ्यावरील ॲक्ने असलेल्या ठराविक भागाचं संरक्षण होतं. शिवाय, ॲक्ने पॅच तुमच्या पिंपल्समधील पस काढून घेण्यासाठीही फायद्याचे ठरतात. यामुळे पिंपल्स लवकर बरे होण्यास मदत मिळते. ॲक्ने पॅच (Acne Patches) वापरल्यानंतर अगदी 6-8 तासांमध्येच तुम्हाला फरक दिसू शकतो.

  मेकअपचा वापर टाळा – सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्हाला ॲक्नेची समस्या जाणवते, तेव्हा तुम्ही मेकअपचा वापर पूर्णपणे टाळायला हवा. भरपूर मेकअप, आणि मास्क अशा गोष्टींमुळे चेहऱ्यावरील छिद्रं पूर्णपणे ब्लॉक होऊन जातात. त्यामुळे ॲक्ने आणि पिंपल्स वाढण्याची शक्यता निर्माण होते. विशेषतः पावसाळ्यात असं होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मेकअप टाळणंच उत्तम.

  मेकअपऐवजी तुम्ही एखादं मॅट मॉईश्चरायझर किंवा सनस्क्रीन वापरू शकता. तसंच, तुम्ही हलका मेकअप वापरत असाल, तर दिवसातून दोन वेळा फोमिंग फेसवॉश किंवा हलक्या क्लिंझरने आपला चेहरा धुणं गरजेचं आहे. या टिप्सचा वापर करून तुम्ही मास्कने तर टाळू शकताच; मात्र सोबतच तुम्ही ऑयली स्किन, बंद पोअर्स अशा इतर त्वचेच्या समस्याही टाळू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Corona spread, Skin care