पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? दोन वेगवेगळ्या कोरोना रिपोर्टमुळे नागरिकांचं टेंशन वाढलं

पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? दोन वेगवेगळ्या कोरोना रिपोर्टमुळे नागरिकांचं टेंशन वाढलं

पहिला रिपोर्ट क्रॉसचेक करण्यासाठी केली दुसरी टेस्ट...त्यानंतर मात्र हैराण करणारी परिस्थिती समोर उभी राहिली आहे

  • Share this:

चंडीगड, 13 सप्टेंबर :सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तर दुसरीकडे आता नवीनच  त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. कोरोना टेस्ट केल्यानंतर दोन वेगवेगळ्या रिपोर्टमुळे लोकांसमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. केंद्रशासित प्रदेश चंडीगडच्या सेक्टर 27 मध्ये राहणाऱ्या एका कुटुंबीयांचे टेंशन प्रचंड वाढलं आहे. गेले काही दिवस त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होते. कुटुंबातील गर्भवती महिलेने दोन विविध ठिकाणाहून कोरोनाची टेस्ट करवून घेतली. मात्र दोन्ही लॅबमध्ये वेगवेगळा रिपोर्ट आल्याने कुटुंबीय टेंशनमध्ये आले आहे. पहिला रिपोर्ट क्रॉस चेक करण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबासह पत्नीचीही कोरोना टेस्ट केली ज्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

या लॅबमध्ये त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. दोन दिवसात विविध लॅबमध्ये चाचणीचा वेगवेगळा रिपोर्ट आल्याने कुटुंबीय हैराण झाले आहे. यानंतर त्यांनी नगरसेवकाला यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.

हे ही वाचा-अमित शहा आणखी 1-2 दिवस हॉस्पिटलमध्येच राहणार, AIIMSने जारी केलं Health Bulletin

नगरसेवक देंवेंद्र सिंग यांच्या मदतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं आहे. आणि विविध लॅबमधील रिपोर्ट मीडियाला उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गर्भवती महिलेच्या पतीने सांगितले की, त्यांच्या पत्नीच्या प्रसुतीची तारीख जवळ आली आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तिची कोविड चाचणी करणे अनिवार्य होते. यासाठी कोरोनाची आरटी-पीसीआर पद्धतीने एका खासगी लॅबमधून चाचणी केली. ज्यामध्ये त्यांच्या पत्नीचा रिपोर्य पॉझिटिव्ह आला. गर्भवती महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार लॅबचा रिपोर्ट क्रॉस चेक करण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीसह कुटुंबीयांचे कोरोना चाचणी केली. त्यांनी आपल्या कुटुंबातील  15 जणांची चाचणी केली. त्या सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. पहिल्या रिपोर्टनंतर त्यांनी आपल्या पत्नीला एका रुग्णालयात दाखल केले होते. तेथे तिने एका गोंडस मुलाल जन्म दिला.

Published by: Meenal Gangurde
First published: September 13, 2020, 5:13 PM IST

ताज्या बातम्या