मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'या'दिवशी लॉन्च होणार कोरोना रुग्णांसाठी गोळ्या; हैद्राबादची कंपनी करणार उत्पादन

'या'दिवशी लॉन्च होणार कोरोना रुग्णांसाठी गोळ्या; हैद्राबादची कंपनी करणार उत्पादन

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असतानाही देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असतानाही देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असतानाही देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे.

 मुंबई, 29 जुलै-  कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असतानाही देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे. हैदराबादमधील झेनारा फार्मा  ही कंपनी काही दिवसांमध्येच कोविड-19 अँटिव्हायरल गोळ्या लाँच करणार आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने या गोळ्यांचं उत्पादन आणि विक्रीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांमध्ये या गोळ्या लाँच होतील, असं कंपनीने म्हटलं आहे.

पॅक्सझेन असणार नाव

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, निर्म्लाट्रेल्व्हिर  आणि रिटोनावीरकॉम्बी पॅक असणाऱ्या पॅक्स्लोव्हिडची निर्मिती ते करतील. या गोळीची ‘पॅक्सझेन’  या नावाने विक्री करण्यात येईल. या गोळ्या आणि त्यासाठीचे अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडिएंट्स (APIs) हे पूर्णपणे भारतात तयार करण्यात येतील.पॅक्स्लोव्हिड हे कोविड-19 अँटिव्हायरल औषध  आहे, जे तोंडावाटे घेता येऊ शकतं. कोरोनाच्या हलक्या आणि मध्यम स्तरातील अशा रुग्णांसाठी हे सुचवलं जातं, ज्यांना रुग्णालयात भरती करण्याची शक्यता अधिक आहे. डिसेंबर 2021 मध्ये अमेरिकेने पहिल्यांदा या औषधाच्या वापराला मान्यता दिली होती.

जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता

झेनारा कंपनी ज्या घटकांपासून हे औषध बनवणार आहे, त्यांचाच वापर करून या पूर्वी फायझरनेही अशा प्रकारच्या गोळ्या तयार केल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या औषधाला मान्यता दिली आहे. “फायझरचे कोरोना अँटिव्हायरल ड्रग हे कोरोनाची ज्यांना गंभीर लागण होऊ शकते अशा रुग्णांसाठी नक्कीच फायद्याचं आहे. विशेषतः लस न घेतलेल्या, वृद्ध किंवा इम्युन रिस्पॉन्स न देणाऱ्या रुग्णांसाठी हे उपयोगी आहे.” असं जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या एका पत्रकात म्हटलं आहे.

फायझरने या पूर्वी गोळ्या बनवल्या असल्या, तरी फायझर किंवा अन्य कोणत्याही कंपनीच्या कोरोनावरील गोळ्या भारतात (Covid-19 pills in India) अद्याप लाँच झालेल्या नाहीत. झेनारा फार्मा ही भारतात अशा गोळ्या आणणारी पहिलीच कंपनी ठरणार आहे. झेनारा कंपनीने स्वतः स्वतंत्रपणे अभ्यास आणि चाचण्या करून याची निर्मिती केली आहे.

(हे वाचा:Corona vaccination मध्ये चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! कोव्हिड लस देताना सर्वात मोठी चूक; VIDEO VIRAL )

किती असणार किंमत?

अद्याप झेनाराने या गोळ्यांची किंमत  निश्चित केली नाही. मात्र, या गोळ्यांच्या संपूर्ण कोर्सची किंमत सुमारे चार हजार रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच, कंपनी सध्या देशातील विविध हॉस्पिटल आणि संस्थांशीदेखील याबाबत चर्चा करत आहे. त्यामुळे कदाचित कंपनी या संस्थांसोबत टाय-अपदेखील करू शकते.

First published:

Tags: Covid cases, Covid-19