जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / कायच्या काय..! 10 हजार रुपये देऊन Corona Positive सोबत डिनर पार्टी

कायच्या काय..! 10 हजार रुपये देऊन Corona Positive सोबत डिनर पार्टी

कायच्या काय..! 10 हजार रुपये देऊन Corona Positive सोबत डिनर पार्टी

कोरोना व्हायरस (Coronavirus) पुन्हा एकदा जगभर थैमान घालत आहे. जगभरातले देश कोरोनासारख्या महामारीचा पुन्हा एकदा सामना करत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

इटली, 14 जानेवारी: कोरोना व्हायरस (Coronavirus) पुन्हा एकदा जगभर थैमान घालत आहे. जगभरातले देश कोरोनासारख्या महामारीचा पुन्हा एकदा सामना करत आहेत. Omicron व्हेरिएंटमुळे कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत अधिकाधिक लोकांचं (COVID-19 Vaccine) लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. पण काही जण लस न घेण्यासाठी ‘धोकादायक युक्त्या’ अवलंबत आहेत. ते स्वतः मुद्दाम कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) होत आहेत, जेणेकरून त्यांना लस घ्यावी लागू नये. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, इटलीमध्ये अँटी वॅक्सर (Anti Vaxxer) लसीकरण टाळण्यासाठी विचित्र युक्त्या अवलंबत आहेत. इटलीमध्ये 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रत्येकासाठी (50 वर्षांपेक्षा जास्त) लस घेणे अनिवार्य होणार आहे. लस न घेणाऱ्यांवर सरकार कारवाई करून दंड आकारणार आहे. नोकरीही जाऊ शकते. मात्र असे असूनही काही लोक समजून घ्यायला तयार नाहीत. पैसे खर्च करून स्वतःला करत आहेत संक्रमित ! इटालियन अँटी वॅक्सर्स (Anti Vaxxers) कोविड-पॉझिटिव्ह लोकांसोबत डिनर आणि वाईन पार्टी करत आहेत जेणेकरून ते स्वतःला संक्रमित करू शकतील. यासाठी ते स्वत: 10 हजार रुपयांहून अधिक खर्च करत आहेत. लसविरोधी लोक कोविड पार्टीमध्ये (Covid Party) सामील होत आहेत. आपले पैसे खर्च करून, ते संक्रमित लोकांसोबत गुप्तपणे पार्टी करत आहेत जेणेकरून ते देखील कोरोना पॉझिटिव्ह होतील आणि त्यांना लस घ्यावी लागणार नाही. कारण संक्रमित लोकांना काही काळ लसीकरण केले जाणार नाही. हेही वाचा-   शाळेत Corona चा शिरकाव, 6 ते 18 वयोगटातील 39 विद्यार्थी Positive नुकतंच टस्कनी येथे एका कोविड पार्टी संदर्भातली माहिती उघडकीस आली. जिथे लोक कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीसोबत डिनर आणि वाईनचा आनंद घेत होते. त्यात सामील होण्यासाठी £110 (11 हजार रुपये) शुल्क ठेवण्यात आले होते. ‘द डेली बीस्ट’ने इटालियन पोलिसांचा हवाला देत म्हटले आहे की, एका अँटी वॅक्सरने ऑनलाइन लिहिले - “मी तातडीने कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या शोधात आहे. मी पैसे देण्यासही तयार आहे.” त्याच प्रकारे लोक कोविड पार्ट्यांच्या शोधात फिरत असल्याचं सांगण्यात आले. दरम्यान, इटलीमधून कोविड पार्टी करत असल्याच्या बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात