मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /लग्नाआधीच कोरोना पॉझिटिव्ह आला नवरदेव, तरीही वरात पोहोचली नवरीच्या दारात; 'असा' झाला विवाह

लग्नाआधीच कोरोना पॉझिटिव्ह आला नवरदेव, तरीही वरात पोहोचली नवरीच्या दारात; 'असा' झाला विवाह

रियासी जिल्ह्यामध्ये निकाहच्या काही दिवस आधीच नवरदेवाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Groom Tests Covid-19 Positive) आला. यानंतर त्याला होम क्वारंटाईन व्हावं लागलं.

रियासी जिल्ह्यामध्ये निकाहच्या काही दिवस आधीच नवरदेवाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Groom Tests Covid-19 Positive) आला. यानंतर त्याला होम क्वारंटाईन व्हावं लागलं.

रियासी जिल्ह्यामध्ये निकाहच्या काही दिवस आधीच नवरदेवाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Groom Tests Covid-19 Positive) आला. यानंतर त्याला होम क्वारंटाईन व्हावं लागलं.

श्रीनगर 11 एप्रिल : लॉकडाऊननं लोकांच्या जगण्याची पद्धतही बरीच बदलली. शिक्षणापासून नोकरीपर्यंत अगदी सगळंच आता घरी बसून करणं शक्य झालं. मात्र, हा कोरोना एवढ्यावरच थांबला नाही, तर या महामारीनं आता घरी बसूनच लग्न (Online Nikah) करण्यासही भाग पाडलं आहे. अशीच एक घटना घडली आहे जम्मूच्या (Jammu) रियासी जिल्ह्यामध्ये.

रियासी जिल्ह्यामध्ये निकाहच्या काही दिवस आधीच नवरदेवाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Tests Covid-19 Positive) आला. यानंतर त्याला होम क्वारंटाईन व्हावं लागलं. अशात नवरदेव वरात घेऊन नवरीला लग्न करून आणण्याासाठी तिच्या घरी भलेही जाऊ शकला नाही. मात्र, मौलवींनी नवरदेव घरातच असतानाही ऑनलाईनच या जोडीचा निकाह केला.

मिळालेल्या माहितीनुसार, रियासी जिल्ह्यातील कोटला गावच्या मनीरचा विवाह बंधार पंचायतच्या पनासा गावातील रजिया बीवी हिच्यासोबत आठ एप्रिलला होणार होता. मनीर शिवखोडी ट्रॅकवर घोडा चालवतो. मागील काही दिवसांपासून इथे घोडा चालवणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. मनीरचीही तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याला होम क्वारंटाईन करण्यात आलं.

कोरोनाची लागण झाल्यामुळे मनीर वरात घेऊन नवरीच्या घरी जाऊ शकत नव्हता. नवरीच्या घरच्यांना जेव्हा हे समजलं तेव्हा तेदेखील चिंतेत पडले. दोन्ही बाजूंकडून लग्नाची सर्व तयारी झाली होती. आपसात बातचीत केल्यानंतर हे लग्न काही दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. याचदरम्यान फॉरेस्ट राइट अॅक्टचे चेअरमन लियाकत अली, माजी सरपंच बशीर अहमद आणि अन्य काही मोठ्या व्यक्तींनी मुलगा आणि मुलीच्या घरच्यांसोबत बातचीत केली. यानंतर असा निर्णय घेण्यात आला, की तारखेत कोणताही बदलाव होणार नाही आणि ठरलेल्या दिवशीच ऑनलाईन पद्धतीनं हा निकाह होईल. यात अशीही सहमती झाली, की केवळ नवरदेवच नाही तर त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण यांच्यासह जवळच्या व्यक्तीही वरातीत सहभागी होणार नाहीत.

नातेवाईक नवरदेवाशिवायच वरात घेऊन पोहोचले. निकाहची वेळ आली तेव्हा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून नवरदेवासोबत संपर्क केला गेला. ऑनलाईन पद्धतीनं हे लग्न पार पडल्यानंतर वधूची पाठवणीही करण्यात आली. मात्र, नवरदेवाची पुढची कोरोना चाचणी 9 एप्रिलला होणार असल्यानं नवरीला तिच्या सासरी न पाठवता रनसूमधील तिच्या मावशीच्या घरी पाठवण्यात आलं. या अनोख्या लग्नाची सगळीकडेच चर्चा रंगली आहे.

First published:

Tags: Marriage, Online dating, Video call