मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

प्रत्येकाला Omicron ची लागण होईल का? WHO ने सांगितली मोठी गोष्ट

प्रत्येकाला Omicron ची लागण होईल का? WHO ने सांगितली मोठी गोष्ट

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले की, ओमिक्रॉन हा कोरोनाचा सर्वात धोकादायक प्रकार डेल्टापेक्षा कमी प्राणघातक आहे. मात्र, यामुळेही लोकं गंभीर आजारी पडू शकतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले की, ओमिक्रॉन हा कोरोनाचा सर्वात धोकादायक प्रकार डेल्टापेक्षा कमी प्राणघातक आहे. मात्र, यामुळेही लोकं गंभीर आजारी पडू शकतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले की, ओमिक्रॉन हा कोरोनाचा सर्वात धोकादायक प्रकार डेल्टापेक्षा कमी प्राणघातक आहे. मात्र, यामुळेही लोकं गंभीर आजारी पडू शकतात.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 25 जानेवारी : कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटने अल्फा, बीटा आणि त्याच्या आधी आलेल्या सर्वात धोकादायक डेल्टा व्हेरियंटलाही मागे टाकले आहे. ओमिक्रॉन हा या सर्वांपेक्षा खूपच धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याचे सिद्ध होत आहे. याशिवाय भारतासह जगातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनच्या उप-प्रकार BA.2 ची प्रकरणे देखील नोंदवली जात आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अधिकारी मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन डेल्टापेक्षा कमी प्राणघातक आहे, मात्र, तरीही तो लोकांना आजारी बनवू शकतो.

Omicron ची लागण झालेल्या लोकांना धोका कायम

मारिया व्हॅन केरखोव्ह यांना लोकांनी काही प्रश्न विचारले जसे की, जर ओमिक्रॉन कमी प्राणघातक असेल तर लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज का पडतेय किंवा अजूनही लोकं का मरतायेत? त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ज्या लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे, त्यांना या आजाराचा पूर्ण धोका असतो. काहींना लक्षणे असू शकतात किंवा नसू शकतात. मात्र, तरीही त्यांना गंभीर आजार किंवा मृत्यूचा धोका असतो.

या लोकांमध्ये कोविड 19 चे गंभीर स्वरूप आढळू शकते

मारिया यांनी सांगितले की, जे लोक कोणत्याही जुनाट आजाराने ग्रस्त आहेत किंवा जे वृद्ध आहेत किंवा ज्यांनी अद्याप लसीकरण केलेले नाही, ते ओमिक्रॉनच्या संसर्गानंतर कोविड 19 च्या गंभीर स्वरुपात आढळू शकतात. लोकांनी मारियाला विचारले की प्रत्येकाला ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ शकतो का? त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, सर्कुलेशनच्या बाबतीत ओमिक्रॉन डेल्टाला मागे टाकत आहे आणि तो लोकांमध्ये सहज पसरत आहे. मारिया म्हणाल्या की जरी जगभरात प्रकरणे खूप जास्त येत आहेत, याचा अर्थ असा नाही की सर्वांना ओमिक्रॉन असेल.

कधी होणार कोरोना महामारीचा शेवट? शास्त्रज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

महामारी अजून संपलेली नाही

युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने यापूर्वी म्हटले होते की प्राथमिक डेटा सूचित करतो की कोविड -19 लस ओमिक्रॉन ट्रांसमिशनविरूद्ध कमी प्रभावी आहे, ज्यामुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका देखील जास्त आहे. डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी देखील पुनरुच्चार केला की महामारी अद्याप संपलेली नाही आणि ती हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नका. सध्या कोरोनाच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

भारतात लवकरच तिसरी लाट पीकवर येईल

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फाउची म्हणाले की, लवकरच ओमिक्रॉनची प्रकरणे पीकवर येतील. त्याचवेळी भारतातील संशोधकांच्या विश्लेषणानुसार, 6 फेब्रुवारीपर्यंत पुढील 14 दिवसांत कोरोनाव्हायरस संसर्गाची प्रकरणे शिखरावर जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान तिसरी लाट शिगेला पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

First published:

Tags: Corona updates, Omicron, Who