मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

लहान मुलांना धोका? राज्यात 3.5 वर्षाच्या मुलाला Omicron ची लागण; नवे 7 रुग्ण

लहान मुलांना धोका? राज्यात 3.5 वर्षाच्या मुलाला Omicron ची लागण; नवे 7 रुग्ण

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

7 जणांना नव्याने Omicron ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून आता महाराष्ट्रात या नव्या विषाणूचे सर्वाधिक 17 रुग्ण झाले आहेत. त्यातच आणखी गंभीर बाब म्हणजे या नव्या 7 रुग्णांमध्ये एक जण अवघ्या साडेतीन वर्षांचा आहे.

मुंबई, 10 डिसेंबर: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. Coronavirus चा नवा प्रकार किंवा बदललेलं रूप असलेला (Omicron New variant) ओमिक्रॉनचा धोका आता आणखी वाढला आहे.  7 जणांना नव्याने Omicron ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून आता महाराष्ट्रात या नव्या विषाणूचे सर्वाधिक 17 रुग्ण झाले आहेत. त्यातच आणखी गंभीर बाब म्हणजे या नव्या 7 रुग्णांमध्ये एक जण अवघ्या साडेतीन वर्षांचा आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका लहान मुलांना अधिक असेल, असा इशारा काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी दिला होता. तो खरा ठरतो की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे.

राज्यात नव्याने समोर आलेल्या 7 ओमिक्रॉनच्या प्रकरणांमधले 3 रुग्ण मुंबईचे तर 4 पिंपरी चिंचवडचे आहेत. हे सर्व जण परदेशातून प्रवास करून आलेले होते. यापैकी चौघांचं लसीकरण पूर्ण झालेलं होतं. त्यामुळे नवा विषाणू लशीला दाद देत नाही का, अशीही भीती निर्माण झाली आहे. सातपैकी एकाने लशीचा एकच डोस घेतला होता. दुसऱ्यानं अजिबात लस घेतलेली नव्हती. उरलेला रुग्ण साडेतीन वर्षांचा असल्याने त्याला लस घेता आलेलीच नव्हती.

त्यातल्या त्यात दिलासा

या नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही तपासणी करण्यात आली आहे. त्यातल्या कुणाची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली नाही, असं सांगण्यात आलं.

BREAKING : महाराष्ट्रात Omicron चा धोका वाढला, रुग्ण संख्या पोहोचली 17 वर!

 जगभरात चिंता वाढवणाऱ्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्रातही शिरकाव केला आणि आता प्रभाव वाढतो आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यापूर्वी डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉन बाधित आढळून आले. त्यापैकी डोंबिवली आणि पुण्यातील एक रुग्ण कोरोनामुक्ते झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील निर्बंध हटवण्यात आले. शाळा-महाविद्यालये सुरू (Maharashtra School - Colleges reopen) करण्यात आले. मात्र, त्याच दरम्यान आता नाशकातून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्.याने एकच खळबळ उडाली आहे. (15 students tests positive for coronavirus in Nashik Igatpuri ashram school)

इगतपुरीतील मुंढेगाव येथील आश्रमशाळेतील 15 विद्यार्थअयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या आश्रमशाळेत तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यांनंतर त्याची कोविड चाचणी केली. या कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर इतरही विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्यात आली.

गेल्या एका आठवड्यात अमेरिकेत 133,000 हून अधिक मुले कोरोनाच्या विळख्यात आल्याने खळबळ उडाली होती.

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus cases