Home /News /coronavirus-latest-news /

'कदाचित खूप उशीर झाला', Omicron समोर आता आरोग्यमंत्र्यांनीही टेकले हात

'कदाचित खूप उशीर झाला', Omicron समोर आता आरोग्यमंत्र्यांनीही टेकले हात

Omicron cases in UK : ओमिक्रॉनची प्रकरणं इतकी झपाट्याने वाढत आहेत की आता आरोग्यमंत्र्यांनीही हार मानली आहे.

    लंडन, 20 डिसेंबर : जगभरातील बहुतेक देश कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या (Omicron) दहशतीत आहेत. ब्रिटनमध्ये तर ओमिक्रॉनने अक्षरशः थैमान घातलं आहे (Omicron cases in uk). दिवसेंदिवस ओमिक्रॉनची प्रकरणं वाढत आहेत आणि त्यावर नियंत्रण मिळवणंही कठीण झालं आहे. ओमिक्रॉनशी दोन हात करता करता आता आरोग्यमंत्र्यांनीही हात टेकले आहेत. कोरोनाव्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबत आपल्याला अद्यापही काही माहिती नाही. यावर रिअॅक्ट करण्यात आता कदाचित खूप उशीर झाला आहे. कारण प्रकरणं वेगाने वाढत आहेत, असं वक्तव्य ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजिद जाविद (UK Health Minister Sajid Javid) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांनी ओमिक्रॉनसमोर हारच मानली, हे स्पष्ट होतं आहे. हे वाचा - कोरोनाच्या Omicron व्हेरियंटसमोर 'या' दोन vaccine वगळता इतर निष्प्रभ : संशोधन झी न्यूजने WION रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार संडे टेलीग्राफमधील एका कॉलममध्ये आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी सांगितलं, ओमिक्रॉनच्या आव्हानांकडे आपण नीट पाहायला हवं. याची प्रकरणं समोर येताच शास्त्रज्ञ याचा जास्तीत जास्त अभ्यास करून, माहिती मिळवून त्यावर उपाय सुचवणं ही आपली रणनीती राहिली आहे. जेव्हा याचे स्पष्ट परिणाम दिसतील तेव्हा खूप उशीर झालेला असेल. याआधी एका टीव्ही शोमध्ये ते म्हणाले होते की  ज्या कारणांमुळे परिस्थितीत बिघडली होती आणि संसर्ग वेगाने वाढला होता. त्यावेळी झालेल्या  चुकांपासून सरकारला शिकायला हवं. जर आपण लवकर मोठी पावलं उचलली नाहीत तर प्रकरणं खूप वाढतील. हे वाचा - Alert! सामान्य वाटणारी समस्याच ओमिक्रॉनचं लक्षण; संशोधनात समोर आली धक्कादायक बाब ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी यूके सरकार ख्रिसमसनंतर दोन आठवड्यांच्या लॉकडाउनची योजना आखत आहे. द टाइम्सच्या मते, नियम तयार केले जात आहेत. ज्यात व्यवसाय वगळता बंद-दार बैठकांवर बंदी घालणं, पब आणि रेस्टॉरंटना बाह्य सेवेसाठी मर्यादित करण्याची योजना समाविष्ट आहे. त्याचवेळी द फायनान्शिअल टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तथाकथित प्लॅन सी अंतर्गत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना सौम्य निर्बंधांपासून लॉकडाऊनपर्यंत अनेक पर्याय सादर करण्यात आले आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीसाठी ब्रिटीश सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार गटातून बाहेर पडलेल्या तपशीलांवरून असे दिसून आले आहे की, शास्त्रज्ञांनी मंत्र्यांना चेतावणी दिली आहे की राष्ट्रीय आरोग्य सेवेला व्यवस्थापन पातळीवर हॉस्पिटलायझेशन कमी करण्यासाठी खूप लवकर कठोर उपाययोजना करणं आवश्यक आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Britain, Corona, Coronavirus, Uk

    पुढील बातम्या