Home /News /coronavirus-latest-news /

मी माझं आयुष्य जगले! युवकासाठी ऑक्सिजन सपोर्टवरील वृद्ध महिलेनं सोडला स्वतःचा बेड

मी माझं आयुष्य जगले! युवकासाठी ऑक्सिजन सपोर्टवरील वृद्ध महिलेनं सोडला स्वतःचा बेड

एका युवकाला प्रचंड त्रास होत असल्याचं दिसताच महिलेनं स्वतः खुर्चीवर बसूनच ऑक्सिजन घेत दुसऱ्या बेडसाठी वाट पाहाण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचा बेड या युवकाला (Old Lady Vacates Hospital Bed for Young Man) दिला. ६० वर्षाच्या या महिलेनं केलेलं हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे.

पुढे वाचा ...
    जयपूर 08 मे : कोरोनाच्या संकटकाळात (Corona Pandemic) माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या अनेक सकारात्मक घटनाही (Positive Incidents) समोर येत आहेत. असंच आणखी एक उदाहरण आता समोर आलं आहे. या घटनेत एका वृद्ध महिलेनं एका युवकासाठी रुग्णालयातील आपला बेड सोडला आहे. ही महिला स्वतः ऑक्सिजन सपोर्टवर (Oxygen Support) होती. मात्र, तरीही एका युवकाला प्रचंड त्रास होत असल्याचं दिसताच तिनं स्वतः खुर्चीवर बसूनच ऑक्सिजन घेत दुसऱ्या बेडसाठी वाट पाहाण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचा बेड या युवकाला (Old Lady Vacates Hospital Bed for Young Man) दिला. ६० वर्षाच्या या महिलेनं केलेलं हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. ही घटना आबे राजस्थानच्या पाली येथील. पालीच्या राणा गावात राहाणाऱ्या 60 वर्षीय लेहर कंवर यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. लेहर यांच्यात कोरोनाची लक्षणं जाणवत होती आणि शुक्रवारी सकाळी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं त्यांना पालीच्या बांगड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चार तास ओपीडीमध्ये व्हिलचेअरवर बसून वाट पाहिल्यानंतर लेहर यांना एक बेड मिळाला मात्र तितक्यात त्यांची नजर गाडीमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका युवकावर गेली. गाडीमध्ये 40 वर्षीय बाबूलाल जीवन आणि मरणाच्या दारात उभा होता. मिळालेल्या माहितीनुसार त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि प्रकृती गंभीर होती. लेहर कंवर यांनी जेव्हा उपचाराशिवाय जीवन मरणाशी झुंज देणाऱ्या बाबूरामला पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या पत्नीला बोलावून घेत संपूर्ण माहिती घेतली. यानंतर लेहर यांनी डॉक्टरांना बोलवत आपला बेड बाबूरामला देण्याची विनंती केली. लेहर म्हणाल्या, की मी माझ्या वाट्याचं जीवन जगले. माझ्या मुलांची लग्नदेखील झाली आहे. मात्र, या व्यक्तीची लहान लहान मुलं आहेत. त्यामुळे, त्यांच्यावर उपचार करा. माझा बेड सध्या त्यांना द्या. मी आणखी काही वेळ व्हिलचेअरवरच वाट पाहाते. ज्यावेळी लहर यांनी हा निर्णय घेतला तेव्हा बाबूरामची ऑक्सिजन लेवल 43 वर पोहोचली होती. त्याला तात्काळ उपचार मिळाले नसते तर कदाचित जीव वाचवणं शक्यही झालं नसतं. याआधी नागपुरमधूनही असंच एक प्रकरण समोर आलं होतं. इथे 85 वर्षीय नारायण भाऊराव दाभाडकर यांनीही एका युवकाला रुग्णालयातील आपला बेड दिला होता. तेदेखील नागपूरमधील एका रुग्णालयात भर्ती होते. यावेळी त्यांनी पाहिलं की महिला आपल्या पतीला दाखल करुन घेण्यासाठी विनंती करत होती. रुग्णालयात बेड शिल्लक नसल्यानं तिला नकार देण्यात आला होता मात्र ती वारंवार डॉक्टरांकडे विनंती करत होती. या सर्व प्रकार पाहून नारायण दाभाडकर यांनी डॉक्टरांना बोलावलं आणि आपला बेड या महिलेच्या पतीला देण्याची विनंती केली. दाभाडकर म्हणाले, की मी माझं आयुष्य जगलो आहे. मात्र, हा व्यक्ती अजून तरुण आहे आणि त्याची लहान मुलं आहेत. कृपया माझा बेड त्याला द्या, मला घरी जायचं आहे. यानंतर त्यांचा बेड या तरुणाला देण्यात आला आणि घरी गेल्यानंतर तीन दिवसाच्या आतच दाभाडकर यांचा मृत्यू झाला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona patient, Positive story, Private hospitals

    पुढील बातम्या