नवी दिल्ली, 23 मार्च: डेल्टाक्रॉन(Deltacron) या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराने भारतात दार ठोठावले असून महाराष्ट्र-दिल्लीसह 7 राज्यांमध्ये 568 प्रकरणांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, एक दिलासा देणारी बातमी आहे आणि नोव्हावॅक्स(Novavax) कोविड-19 लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. नोव्हॉवॅक्सने भारतात 12-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता जाहीर केली आहे.
भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ही लस बनवत आहे. भारतात ती Covovax या नावाने ओळखली जाईल. ही पहिली प्रोटीन-आधारित लस आहे.
सप्टेंबर 2020 मध्ये नोवाव्हॅक्सने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता. 2 बिलियन लसींची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती.
Novovax' COVID-19 vaccine gets emergency use authorisation for adolescents between 12-18 yrs in India
Read @ANI Story | https://t.co/6lTNg5gPU7#Novavax #covovax #SII #CovidVaccine #Covidvaccination pic.twitter.com/1W0I71mQl0 — ANI Digital (@ani_digital) March 23, 2022
तर, कोवोव्हॅक्स ही भारतातील चौथी अशी लस आहे जी देशात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाईल. याआधी भारतात बायोलॉजिकल ई ची Corbevax, झायडस कॅडिलाची ZyCoV-D आणि भारत बायोटेकची Covaccine 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर वापरली जात होती.
ही लस ८० टक्के प्रभावी आहे. भारतात १२ ते १७ वर्षे वयोगटातील २ हजार ७०७ मुलांवर या लसीची चाचणी घेण्यात आली. नोव्हावॅक्सची लस ‘कोव्होव्हॅक्स’ला गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच मंजूरी देण्यात आली होती. पण तेव्हा ही मान्यता केवळ १८ वर्षांवरील लोकांसाठी होती. Covovax ला नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Vaccine