मराठी बातम्या /बातम्या /Viral /कॉलेजमधील 'One Night Stand' ने उद्धवस्त केलं तरुणीचं आयुष्य; आता या गोष्टीमुळे होतोय पश्चाताप

कॉलेजमधील 'One Night Stand' ने उद्धवस्त केलं तरुणीचं आयुष्य; आता या गोष्टीमुळे होतोय पश्चाताप

कॉलेजमध्ये असताना तिनं 'वन नाइट स्टँड'चा (one night stand) अनुभव घेतला होता. यादरम्यान तिनं अनप्रोटेक्टडेट सेक्स (Unprotected sex) केला होता.

कॉलेजमध्ये असताना तिनं 'वन नाइट स्टँड'चा (one night stand) अनुभव घेतला होता. यादरम्यान तिनं अनप्रोटेक्टडेट सेक्स (Unprotected sex) केला होता.

कॉलेजमध्ये असताना तिनं 'वन नाइट स्टँड'चा (one night stand) अनुभव घेतला होता. यादरम्यान तिनं अनप्रोटेक्टडेट सेक्स (Unprotected sex) केला होता.

  नवी दिल्ली 02 डिसेंबर : भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे पडसाद कधी ना कधी आपल्या वर्तमानावर आणि भविष्यावर उमटतात, असं म्हटलं जातं. आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांना भूतकाळातल्या चुकांचे परिणाम खूप काळ भोगावे लागत आहेत. विशेषत: ज्या चुका तरुणपणात केलेल्या असतात, त्यांना त्यावेळी जास्त गांभीर्यानं घेतलं जात नाही. नंतर जेव्हा त्याचे परिणाम अचानक समोर येतात तेव्हा मात्र पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहत नाही. अमेरिकेत (America) फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या एका महिलेलादेखील असाच अनुभव आला आहे.

  तरुणपणात केलेल्या चुकांचे (Mistakes) परिणाम तिला आता भोगावे लागत आहेत. 1 डिसेंबरला झालेल्या जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने (World AIDS Day) 'आज तक'ने या महिलेबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं. महाविद्यालयामध्ये असताना आपलं आयुष्य सर्वांत चांगल्या वळणावर असतं. आपल्याला दररोज नवनवीन गोष्टी अनुभवण्याची इच्छा असते. ही महिलादेखील त्याला अपवाद नव्हती. कॉलेजमध्ये असताना तिनं 'वन नाइट स्टँड'चा (one night stand) अनुभव घेतला होता. यादरम्यान तिनं अनप्रोटेक्टडेट सेक्स (Unprotected sex) केला होता.

  प्रत्यक्षात तिनं आपल्या सोबतच्या पुरुषाला कंडोम वापरण्यास सांगितलं होतं; मात्र त्यानं खोलीबाहेर जाऊन कंडोम लावण्याचं फक्त नाटक केलं. तो जेव्हा परत आला तेव्हा या महिलेनं आनंद घेण्याच्या नादात कंडोम (Condom) आहे की नाही याची खात्री केली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बाथरूममध्ये पॅक असलेलं कंडोम सापडलं. दुर्दैवानं ज्या व्यक्तीसोबत तिनं सेक्स केला ती व्यक्ती एचआयव्हीबाधित (HIV) होती. परिणामी या महिलेलादेखील काही काळानंतर एचआयव्हीची बाधा झाली.

  एड्स हा एक भयानक विकार आहे. त्याची लक्षणं अनेक वर्षं आपल्या शरीरात दडून राहू शकतात. संसर्ग धोकादायक स्थितीला गेल्यानंतर तो उघड होतो. या महिलेच्या बाबतीतदेखील असंच काहीसं घडलं. कॉलेजमध्ये असताना अनप्रोटेक्टटेड सेक्स केल्याच्या काही दिवसांनंतर 2001मध्ये तिला अचानक डोकेदुखी सुरू झाली. भूक लागल्यामुळं डोकं दुखत असावं, हा विचार करून ती आणि तिची मैत्रीण अशा दोघी कॅफेटेरियामध्ये खाण्यासाठी गेल्या. तिथे गेल्यानंतर मात्र ही महिला चक्कर येऊन पडली.

  कॅम्पसमधल्या आरोग्य केंद्रातल्या नर्सने या महिलेला मूत्रमार्गात संसर्ग (UTI) झाल्याचं सांगितलं आणि काही अँटीबायोटिक्स देऊन घरी पाठवलं. काही आठवड्यांनंतर तिचं वजन अचानक कमी झालं व ती प्रचंड आजारी पडली. ती इतकी कृश दिसू लागली होती, की तिच्यावर लोकांनी ड्रग्ज घेत असल्याचे आरोपदेखील केले होते. आपल्यासोबत काही तरी फार वाईट होणार आहे, अशी तिला जाणीव होऊ लागली होती; मात्र दोन महिन्यांनंतर तिला अचानक बरं वाटू लागलं.

  या विचित्र आजारपणानंतर जवळपास एका वर्षानं म्हणजे 2002 मध्ये ही महिला प्रेग्नंट झाली. तिनं एका लोकल हेल्थ सेंटरमध्ये तपासणी करण्याचा प्रयत्न केला; मात्र तिच्या तपासण्या वेळेवर झाल्या नाहीत. कुठल्याही तपासण्या न करता तिनं प्रेग्नन्सीचे नऊ महिने काढले. जुलै 2003मध्ये एका लोकल हॉस्पिटलमध्ये तिनं एका मुलीला जन्म दिला. त्याठिकाणी बाळाच्या आणि आईच्या विविध चाचण्या झाल्या. तिच्या बाळाच्या शरीरात एचआयव्ही अँटीबॉडीज (HIV antibodies) असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी महिलेची तपासणी केली. तेव्हा तिला एचआयव्ही असल्याचं उघड झालं.

  काही महिने बाळाच्या नियमितपणे तपासण्या करण्यात आल्या. बाळाला अँटीरेट्रोव्हायरल औषधं दिली, जेणेकरून त्याच्या शरीरातल्या एचआयव्ही अँटीबॉडीस मजबूत राहाव्यात. औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर बाळाची तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट एचआयव्ही निगेटिव्ह आला.

  एचआयव्हीचं निदान झाल्यानंतर ही महिला घाबरून गेली होती. बाळाच्या काळजीमध्ये आणि उपचारांमध्ये गुंतून राहिल्यानं तिला जवळजवळ एक वर्षभर स्वत:च्या उपचारांसाठी वेळ मिळाला नाही. नंतर ती 'हेल्थ फॅमिली' नावाच्या प्रोग्रामशी जोडली गेली. 'हेल्थ फॅमिली प्रोग्राममुळं मी एका सामाजिक कार्यकर्त्याशी जोडले गेले. त्यांनी मला माझ्या मुलीच्या संगोपनासाठी मदत केली. स्वत:ला मानसिक ताणातून बाहेर काढण्यासाठी मी हळूहळू माझ्या आसपास असणाऱ्या लोकांना माझ्याबद्दल सांगू लागले. ज्यांना मी जास्त ओळखत नाही अशा लोकांना मी माझी गोष्ट सांगते, जेणेकरून त्यांनी मला चांगली वागणूक दिली नाही तरी मला त्रास होणार नाही. मी स्वत:ची समजूत घालायचे. सुदैवानं माझ्या कुटुंबानं मला माझ्या आजारपणामुळं वाळीत टाकलं नाही. त्यांनी मला स्वीकारलं. त्यांच्या पाठिंब्यामुळं मी पुन्हा आपलं आयुष्य सुरू करू शकले' अशी प्रतिक्रिया या महिलेनं दिली आहे.

  आपल्यासारख्या अनेक व्यक्ती समाजामध्ये आहेत, याची जाणीव झाल्यानंतर या महिलेनं एचआयव्हीग्रस्तांसाठी काम करण्यास सुरुवात केली. एचआयव्हीबाधितांना मानसिक बळ देण्यासाठी ती त्यांना आपली गोष्ट सांगू लागली. 2007मध्ये एका लोकल न्यूजपेपरमध्ये या महिलेची गोष्ट छापून आली होती. त्यामुळे तिला थोडीफार ओळख मिळाली. चर्च आणि शाळांमध्ये जाऊन तिनं एचआयव्हीबाबत जागृती सुरू केली. कारण, शिक्षण घेत असतानाच तिला एचआयव्हीची लागण झाली होती. म्हणून तिनं शाळा आणि कॉलेजमधील तरुणांचं समुपदेशन करण्यास सुरुवात केली, जेणेकरून इतर कुणाची स्थिती तिच्यासारखी होऊ नये.

  2012 मध्ये या महिलेनं एचआयव्हीग्रस्तांसोबत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न केलं. तिच्या पतीनं तिला कायम पाठिंबा दिला; मात्र 2019मध्ये त्याचा मृत्यू झाला. सध्या या महिलेची मुलगी एकदम ठीक असून हायस्कूलमध्ये आहे. दररोज एक गोळी खाऊन ही महिला आपलं आजारपण स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. वर्षातून दोनदा ती आपल्या सर्व चाचण्या करून घेते. ही महिला एचआयव्हीबाधित असली, तरी ती व्हायरली सरपास्ड आहे. याचाच अर्थ तिनं सेक्स केला, तरी समोरच्या व्यक्तीला संसर्ग होणार नाही.

  एड्सवर ठोस उपचार नाहीत, ही गोष्ट खरी आहे. परंतु, विविध लहान-मोठ्या उपचारांच्या साह्यानं या क्रॉनिक डिसीजवर नियंत्रण मिळवता येतं. असे अनेक उपाय उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही रोगप्रतिकारशक्ती मजबूत करून व्हायरसला वाढण्यापासून रोखू शकता. तुम्ही एचआयव्हीग्रस्त असूनही, सुरक्षित शारीरिक संबंध ठेवू शकता, मुलं होऊ देऊ शकता आणि आनंदी जीवन जगू शकता.

  या महिलेनं आता स्वत:ला आहे त्या स्थितीमध्ये स्वीकारलं आहे. सोबतच, 'वन नाइट स्टँड'मधल्या ज्या व्यक्तीमुळे तिला एचआयव्हीची लागण झाली होती, त्या व्यक्तीलादेखील तिनं माफ केलं आहे. या महिलेची गोष्ट वाचल्यानंतर नक्कीच तुम्हालाही वाईट वाटलं असेल. आपल्यावर अशी वेळ येऊ नये, यासाठी प्रत्येकानं योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

  First published:

  Tags: Shocking news