मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /एका तासात आवरायचं अन्यथा...;बाजार पेठेतील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नाशिक पोलिसांचा नवा फंडा

एका तासात आवरायचं अन्यथा...;बाजार पेठेतील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नाशिक पोलिसांचा नवा फंडा

शहरातील मुख्य बाजार पेठेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका यांनी नवीन फंडा काढला आहे.

शहरातील मुख्य बाजार पेठेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका यांनी नवीन फंडा काढला आहे.

शहरातील मुख्य बाजार पेठेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका यांनी नवीन फंडा काढला आहे.

नाशिक, 29 कोरोना : सध्या राज्यात कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत आहे. 28 मार्च रोजी राज्यात 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मुंबई, पुणे आणि नाशिक येथे सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याचं समोर आलं आहे. नाशिकमधील शहरातील मुख्य बाजार पेठेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका यांनी नवीन फंडा काढला आहे. बाजार पेठेत खरेदी करण्यासाठी गर्दी केलेल्या नागरिकांना 1 तासांच्या आत सर्व वस्तू खरेदी करून आता घरी परतावे लागणार आहे.

1 तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास संबंधित नागरिकाला 500 रुपये प्रति व्यक्ती दंड भरावा लागणार आहे. शालिमार, टिळकपथ, बादशाही कॉर्नर, धुमाळ पॉईंट, मेनरोड, शिवाजी रोड, मुख्य बाजार समिती, सिटी सेंटर मॉल इथं प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम हाती घेण्यात आला असून हळूहळू हा उपक्रम संपूर्ण शहरात राबवला जाणार आहे.

नाशिकमध्ये कोरोनाची (Nashik Corona Update) दाहकता कायम असून पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 2925 नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून अवघ्या 3 दिवसात 14 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 2179 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्यात आतापर्यंत बळींची संख्या 2326 पर्यंत पोहोचली आहे. शहरात 8 तर नाशिक ग्रामीण 6 तर मालेगावात 4 मृत्यू झाले आहेत.

हे ही वाचा-'इतिहासातील सर्वात मोठा नरसंहार'; या देशात एका दिवसात मृत्यूचा रेकॉर्ड

नाशिक शहर हॉटस्पॉट कायम

- 24 तासात 1890 नवे पॉझिटिव्ह

- शहरात 8 बळी

- बळींची संख्या झाली 1128

- तर शहरात 1265 प्रतिबंधीत क्षेत्र

- शहरात शनिवार आणी रविवार 2 दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद

- रुग्णसंख्येचा वाढता आलेख धक्कादायक

- शहरात 3 दिवसात नवे 14 हजार नवे बाधीत

24 मार्च

2779 नवे बाधीत

12 मृत्यु

25 मार्च

2644 नवे बाधीत

15 मृत्यु

26 मार्च

3338 नवे बाधीत

10 मृत्यु

27 मार्च

4918 नवे बाधीत

25 मृत्यु

28 मार्च

2925 नवे बाधीत

18  मृत्यु

First published:

Tags: Corona, Corona spread, Nashik