जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / New Method of Corona Testing: चाचणीची पद्धत झाली सोपी, आता फक्त ओरडायचं

New Method of Corona Testing: चाचणीची पद्धत झाली सोपी, आता फक्त ओरडायचं

New Method of Corona Testing: चाचणीची पद्धत झाली सोपी, आता फक्त ओरडायचं

या नव्या पद्धतीनं कोरोना चाचणी (New Method of Corona Testing) करण्यासाठी तुम्हाला फक्त एका रुममध्ये जोरानं ओरडावं किंवा गाणं म्हणावं लागणार आहे आणि तुमची चाचणी झाली. या पद्धतीमुळे आता नाकातून आणि तोंडातून स्वॅब घेण्याची गरज नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

एम्सटर्डम 06 मार्च : कोरोना (Coronavirus) चाचणीच्या वेदनादायी प्रकारापासून आता सुटका मिळणार आहे. नेदरलँडमधील एका शास्त्रज्ञानं कोरोना चाचणी करण्याची नवी पद्धत (New Method of Corona Testing) शोधून काढली आहे. ही पद्धती जुन्या पद्धतीपेक्षा एकदम वेगळी आणि जलद आहे. या नव्या पद्धतीनं कोरोना चाचणी करण्यासाठी तुम्हाला फक्त एका रुममध्ये जोरानं ओरडावं किंवा गाणं म्हणावं लागणार आहे आणि तुमची चाचणी झाली. या पद्धतीमुळे आता नाकातून आणि तोंडातून स्वॅब घेण्याची गरज नाही. कोरोना चाचणीच्या नव्या पद्धतीचा शोध लावणाऱ्या या शास्त्रज्ञाचं नाव पीटर वैन वीस असं आहे. पीटर यांच्या म्हणण्यानुसार ही चाचणी करण्यासाठी व्यक्तीला हवाबंद रुममध्ये जाऊन जोरानं ओरडावं किंवा गाणं म्हणावं लागेल. यानंतर एक इंडस्ट्रीयल एअर प्यूरीफायर तोंडातून निघणारे हे पार्टीकल्स एकत्र करेल, याचाच वापर कोरोना चाचणी करण्यासाठी केला जाईल. शास्त्रज्ञ असलेल्या पीटरनं सांगितलं, की एखादा व्यक्ती कोरोना संक्रमित असल्यास ओरडल्यानंतर त्याच्या तोंडातून 10 हजार पार्टीकल्स बाहेर येतात.याच पार्टीकल्सच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी केली जाते. पीटरनं नेदरलँडच्या एम्सटर्डममध्ये कोरोना टेस्टिंग सेंटरजवळच आपला बूथ लावला आहे. इथे ते या नव्या पद्धतीनं कोरोना चाचणी करतात. ओरडून किंवा गाणं म्हणून कोरोना चाचणी करणाऱ्या सोरोयानं सांगितलं, की ही पद्धत अतिशय सोपी आहे. यात वेदनाही होत नाहीत. जेव्हा तुम्हाला कोणीच पाहात नसतं तेव्हा ओरडण्याचा आनंद खूप वेगळाच असतो. कोरोना चाचणीत माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याचं तिनं म्हटलं आहे. पीटर यांनी सांगितलं, की या प्रक्रियेला केवळ 3 मिनीटांचा वेळ लागतो. या सॅम्पलमधील कोरोना विषाणूची चाचणी नॅनोमीटर-स्केल साईजिंग डिवाईसच्या मदतीनं केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात