मुंबई, 19 जानेवारी: कोरोनाच्या उपचारांदरम्यान (New Covid Treatment Guidelines) वापरण्यात येणाऱ्या औषधांसंदर्भात सरकारने नवीन निर्देश जारी केले आहेत. त्या निर्देशांनुसार डॉक्टरांना कोरोनाच्या रुग्णांना स्टिरॉइड्स देता येणार नाहीत. याचबरोबर औषधांच्या अतिसेवनाबद्दलही इशारा देण्यात आला आहे. सरकारने कोरोनासाठी तयार केलेल्या टास्क फोर्सच्या प्रमुखांनी उपचारांमध्ये होत असलेल्या औषधांच्या अतिवापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्टिरॉइड्ससारखी औषधं जर जास्त प्रमाणात, रुग्णाला गरज नसताना किंवा दीर्घ कालावधीसाठी वापरली दिली तर त्याला म्युकरमायकॉसिस किंवा 'ब्लॅक फंगस'सारख्या संसर्गाचा धोका होण्याची शक्यता वाढते. तसंच जर खोकला आणि कफ दोन किंवा तीन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस असेल तर रुग्णांनी टीबी आणि इतर आजारांची तपासणी करावी, अशाही सूचना या मार्गदर्शक तत्त्वांत देण्यात आल्या आहेत.
तसेच श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा हायपॉक्सियाची स्थिती नसताना अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये कोरोनाची लक्षणं दिसली तर त्यांना गंभीर मानलं जाणार नाही असं सुधारित मार्गदर्शक तत्त्वांत सांगितलं आहे. अशी लक्षणं आढळल्यास होम आयसोलेशनमध्ये राहून विशेष काळजी घेण्यास सांगितलं आहे. त्याशिवाय कोविडची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना जर श्वास घेण्यास त्रास होत असेल व ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा अधिक काळ असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा.
हे वाचा-भारतात कधी शिगेला पोहोचणार कोरोनाची तिसरी लाट? रोज येणार 7 लाखहून अधिक नवे रुग्ण
ज्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो आहे आणि ऑक्सिजन सॅच्युरेशनची पातळी 90-92 टक्क्यांदरम्यान सारखी वर-खाली होते आहे अशांना हॉस्पिटलमध्ये भरती करणं गरजेचं आहेत. अशा रुग्णांच्या आजाराला मध्यम दर्जाचा कोविड आजार मानलं जाईल आणि त्यांना ऑक्सिजन सपोर्ट देणं गरजेचं असेल. श्वासोच्छवासचा वेग दर मिनिटाला 30 पेक्षा जास्त आहे आणि दम लागत असेल किंवा ऑक्सिजन सॅच्युरेशनची पातळी 90 टक्क्यांहून कमी आहे, अशा रुग्णाचा आजार गंभीर स्वरूपाचा मानून त्या रुग्णांना ICU मध्ये भरती करण्यात यावं असा सूचना देण्यात आल्या आहेत; कारण अशा रुग्णांना श्वास घेण्यासाठी सपोर्टची गरज आहे.
हे वाचा-Covid Symptoms: तज्ज्ञ सांगतात, Long Covid रुग्णांमधली ही लक्षणं चिंताजनक
सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार सौम्य ते गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत रेमडेसिव्हिर औषध देण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्या रुग्णांना कोविडची कुठलीही लक्षणं दिसल्यापासून 10 दिवसांच्या आत ‘रेनल’ किंवा ‘हेप्टिक डिस्फंक्शन’चा त्रास झालेला नाही अशाच रुग्णांना रेमडेसिव्हिर द्यायला परवानगी देण्यात आली आहे. जे रुग्ण कृत्रिमरित्या ऑक्सिजन घेत नाहीत किंवा होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांना हे औषध देण्यात येऊ नये, अशी सूचनाही त्यात देण्यात आली आहे. यानुसारच जर रुग्ण सीरियस असेल आणि आयसीयुमध्ये भरती गेल्यानंतर 24 ते 48 तासांत त्याची तब्येत आणखीनच गंभीर परिस्थितीत पोहोचली तर इमर्जन्सीमध्ये टोसिलीजुमाब हे औषध त्या रुग्णाला दिलं जाऊ शकतं. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीचं पालन आता देशभर केलं जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona spread, Corona updates