मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona : देशात गुरुवारी आढळले 5 महिन्यातील सर्वाधिक रुग्ण, राज्यातील परिस्थिती चिंताजनक

Corona : देशात गुरुवारी आढळले 5 महिन्यातील सर्वाधिक रुग्ण, राज्यातील परिस्थिती चिंताजनक

गुरुवारी कोरोनाचे 59 हजाराहून अधिक नवे रुग्ण (Active Corona Cases in India) समोर आले आहेत. मागील 159 दिवसांमधील ही सर्वात मोठी संख्या आहे. यातील 36 रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील (Corona Cases in Maharashtra) आहेत.

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 26 मार्च : देशभरातून समोर येणारी कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी आहे. दररोज नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरात अॅक्विटिव्ह रुग्णांची संख्या (Active Corona Cases in India) आता 4 लाखापेक्षा अधिक झाली आहे. इतकंच नाही तर केवळ ५ दिवसातच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 3 लाखावरुन 4 लाखावर पोहोचली आहे. गुरुवारीदेखील कोरोनाचे 59 हजाराहून अधिक नवे रुग्ण समोर आले आहेत. मागील 159 दिवसांमधील ही सर्वात मोठी संख्या आहे. यातील 36 रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील (Corona Cases in Maharashtra) आहेत.

देशात याआधी अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये झाली होती. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ ६ दिवसात 9 ते 10 लाख झाली होती. आता पुन्हा मागील 15 दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मागील सात दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत 2.6 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. 10 मार्चला18379 असणारा आकडा 25 मार्चला 47439 वर पोहोचला आहे.

राज्यातील परिस्थिती वाईट -

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण यावेळीही महाराष्ट्रातच आढळत आहेत. राज्यात सध्या दिवसाला सुमारे 35 हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. एकट्या मुंबईतच दिवसाला पाच हजारपेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. राज्यातील ठाणे जिल्ह्यात 2,869 नवीन रुग्ण समोर आल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 2,96,023 झाली आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाची सर्वाधिक 35,952 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर, 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

17 राज्यांमधील परिस्थिती गंभीर -

महाराष्ट्राशिवाय इतर सतरा राज्यांमध्ये जानेवारीनंतर गुरुवारी पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गुजरातमध्ये एका दिवसात 1961 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, पंजाबमधूनही 2700 नवीन रुग्ण समोर आले आहेत. मागील वर्षी १८ सप्टेंबरनंतरची ही सर्वात मोठी संख्या आहे.

First published:

Tags: Corona updates, Corona virus in india