जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / 'संजीवनी'चा शुभारंभ! Network 18 आणि Federal Bank यांची लसीकरणाला प्रोत्साहन देणारी मोहीम लाँच

'संजीवनी'चा शुभारंभ! Network 18 आणि Federal Bank यांची लसीकरणाला प्रोत्साहन देणारी मोहीम लाँच

'संजीवनी'चा शुभारंभ! Network 18 आणि Federal Bank यांची लसीकरणाला प्रोत्साहन देणारी मोहीम लाँच

Sanjeevani-A Shot of Life: देशातील दुर्गम भागातही प्रत्येक भारतीयांना Shot of Life अर्थात कोरोना लस मिळावी यासाठी हे फेडरल बँक सीएसआर अभियान आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 07 एप्रिल: जागतिक आरोग्य दिनाचे (World Health Day) औचित्य साधून नेटवर्क 18 (Network 18) आणि फेडरल बँकेने (Federal Bank) कोविड लसीकरणाबद्दल (Covid Vaccination) जागरूकता वाढवण्यासाठी ‘संजीवनी-अ शॉट ऑफ लाईफ’ (Sanjeevani-A Shot of Life) हा अभिनव उप्रकम सुरू केला आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आणि ‘बीएसएफ’ (BSF) अर्थात सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थाना यांच्या उपस्थितीत पंजाबमधील ऐतिहासिक अटारी सीमेवर (Attari Border) जवानांनी केलेल्या शानदार अभिवादन सोहळ्यात आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम श्रीनिवासन उपस्थित होते. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे. या वेळी बोलताना सोनू सूद म्हणाला कि, मला आजही गेल्या वर्षीचा तो काळ आठवतो जेव्हा देशभरातील हजारो मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली होती. आम्ही त्यांना शांत आणि सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं. आता आपल्याकडे कोव्हिडची लस आहे. तेव्हा सगळ्यांनी ही लस घ्यावी असं आवाहन मी करत आहे. लोकांनी कोविड-19 वरील लस घेऊन आपलं कुटुंब आणि समाज यांना सुरक्षित ठेवावं, असं आवाहनही सोनू सूद यांनी केलं.  देशातील प्रत्येकाला अगदी दुर्गम भागातील नागरिकांनाही ही जीवनदायी लस मिळावी यासाठी फेडरल बँकेनं आपल्या सामाजिक जबाबदारी प्रकल्पाअंतर्गत (Corporate Social Responsibility Initiative) हे अभियान सुरू केलं आहे. (हे वाचा- पंढरपूर पोटनिवडणूक प्रचारातील भाजपचा प्रमुख चेहरा कोरोना पॉझिटिव्ह ) या वेळी बोलताना बीएसएफचे महासंचालक राकेश अस्थाना यांनीही लसीसंदर्भातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘या आघाडीवरही आम्हाला पुढं येऊन नेतृत्व करावे लागेल. प्रत्येक जवानाला ही लस दिली आहे. सध्या देशाच्या शत्रूपेक्षा आपल्या आरोग्यावर हल्ला करणाऱ्या या शत्रूशी लढा देण्याची गरज आहे. लसीकरणाबाबत सैन्यदलातील प्रत्येकाला माहिती असून, सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये लस घेण्याबाबत कोणताही गैरसमज, शंका किंवा भीती नाही.’ आता या उपक्रमाअंतर्गत ‘संजीवनी गाडी’ देशभर फिरणार असून अमृतसरपासून सुरुवात करून ती पुढे इंदूर, नाशिक, गुंटूर आणि दक्षिण कन्नडा या पाच जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. देशात सध्या 45 वर्षे वयावरील लोकांना कोविड लसीकरणाचा  तिसरा टप्पा सुरू झाला असून, लवकरच इतर वयोगटातील लोकांचाही यात समावेश करण्याची सरकारची योजना आहे. या उपक्रमात स्वयंसेवी संस्था, सरकारी संस्था आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांचा समावेश करण्यात येणार असून, त्यांच्याद्वारे   लसीबाबत योग्य आणि सविस्तर माहिती लोकांना दिली जाईल. लोकांचे गैरसमज, शंका, भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि वंचित तसेच या आजाराचा सर्वाधिक फटका बसलेल्या नागरिकांना लस देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  प्रत्येकजण सुरक्षित असल्याशिवाय कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. त्यामुळं देशातील लोकांच्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी आवाज उठवण्याचा हा प्रयत्न आहे. (हे वाचा- भारतात येऊन धडकतेय कोरोनाची दुसरी लाट, Sanjeevani Campaign ठरेल देशहिताचे ) केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला, नारायण हेल्थचे अध्यक्ष देवी शेट्टी,  नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत, पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीरसिंग सिद्धू, सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थाना आणि सीएनएनचे मुख्य वैद्यकीय प्रतिनिधी डॉ. संजय गुप्ता आदी मान्यवर या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात