जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Covid-19 : '.... तोपर्यंत कोरोनाची दुसरी लाट थोपवायला हवी,' पंतप्रधानांचं देशाला आवाहन

Covid-19 : '.... तोपर्यंत कोरोनाची दुसरी लाट थोपवायला हवी,' पंतप्रधानांचं देशाला आवाहन

Covid-19 : '.... तोपर्यंत कोरोनाची दुसरी लाट थोपवायला हवी,' पंतप्रधानांचं देशाला आवाहन

देशातील गंभीर कोरोना (Corona) परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काळजी व्यक्त केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 एप्रिल : देशातील गंभीर कोरोना (Corona) परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Prime Minister Narendra Modi) यांनी काळजी व्यक्त केली आहे. देशवासियांनी कोरोनाचा प्रसार गावामध्ये जाण्यापूर्वीच रोखण्यासाठी प्रमुख भूमिका पार पाडावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. पंचायत दिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. पंतप्रधान मोदींच्या भाषणात कोरोनाची गंभीर परिस्थिती हाच मुख्य मुद्दा होता. ‘वर्षभरापूर्वी आपण जेंव्हा पंचायत राज दिवस कार्यक्रमामध्ये भेटलो होतो, त्यावेळी संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत होता. मी त्यावेळी तुम्हाला कोरोना गावात जाण्यापासून रोखण्याचं आवाहन केलं होतं. तुम्ही सर्वांनी अत्यंत कुशलपणे फक्त कोरोनाला गावात जाण्यापासून रोखलं तसंच त्याबद्दल जागृती देखील घडवली. आता वर्षभरानंतर पुन्हा एकदा कोरोना संक्रमण गावांंमध्ये होऊ न देण्याची जबाबादारी आपल्याला पार पाडायची आहे,’ असं पंतप्रधानांनी सांगितलं. ‘कोरोनाबाबत वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या गाईडलाईन्स पालन संपूर्ण गावात होईल याची खबरदारी घ्यायला हवी. यावेळी तर आपल्याकडं व्हॅक्सिनचं कवच आहे. त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारची खबरदारी घेण्यासोबतच गावातील सर्वांनी दोन डोस घेतले पाहिजेत यासाठी देखील दक्ष राहावं लागणार आहे. या कठीण प्रसंगात कुणीही उपाशी झोपू नये, ही आपली जबाबदारी आहे,’ असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. मोफत रेशन योजना ‘केंद्र सरकारनं पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत मोफर रेशन देण्याची योजना पुन्हा सुरु केली आहे. मे आणि जून महिन्यात देशातील प्रत्येक गरिबाला मोफत रेशन मिळेल. आपल्या देशाच्या प्रगती आणि संस्कृतीचं नेतृत्त्व हे नेहमी गावांनीच केलं आहे. त्यामुळे देशाच्या प्रत्येक धोरण हे गावाला केंद्रीत ठेवून करण्यात आलं आहे. ‘ ऑक्सिजनचा पुरवठा रोखला, तर सोडणार नाही…लटकवूच!’ हायकोर्टाने दिली तंबी आधुनिक भारतामधील गावं समर्थ व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. या वर्षी देशालाच्या स्वांत्र्याच्या हिरक मोहत्सवी वर्षात आपण प्रवेश करत आहोत. आपल्यासमोर आव्हानं आहेत. तरीही आपण विकासाचं चक्र जलदगतीनं पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही देखील गावाच्या विकासाचं लक्ष्य निश्चत करा, आणि ते निर्धारित वेळेत पूर्ण होईल याची खबरदारी घ्या,’ असं आवाहन पंतप्रधानांनी या भाषणात केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात