महाराष्ट्रात दररोज 50 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. असे असूनही सोशल डिस्टंन्सिग, मास्क परिधान करणे या साधासुध्या नियमांचे वेळोवेळी उल्लंघन होताना दिसत आहे. (फोटो सौजन्य- ANI)
असेच काही धक्कादायक फोटो नाशिकमधून समोर आले आहेत. Remdesivir साठी मेडिकल दुकानाबाहेर नागरिकांनी केलेली ही गर्दी चिंतेत भर टाकणारी आहे (फोटो सौजन्य- ANI)
नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी अशी माहिती दिली आहे की, रेमडेसीविरबाबत काही निर्देश जारी करण्यात आले आहेत कारण मला असं वाटतं की यामध्ये दखल देण्याची आवश्यकता आहे. मी अपेक्षा व्यक्त करतो की याचा पुरवठा व्यवस्थित केला जाईल (फोटो सौजन्य- ANI)
बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाची सर्वाधिक 59,907 प्रकरणं समोर आली आहेत. यानंतर एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी 31,73,261 झाली आहे. (फोटो सौजन्य- ANI)
मध्यप्रदेशातील इंदूर (Indore) याठिकाणाहून देखील असाच एक व्हिडीओ समोर आला होता. रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. ज्या ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध आहे त्या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळाल्या. इंदूरमधून समोर आलेला व्हिडीओ तेथील भयंकर परिस्थिती दर्शवत आहे