• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • अरे बापरे! हुबेहुब COVID-19 सारखेच; चीनमध्ये सापडले आणखी नवे 24 CORONAVIRUS

अरे बापरे! हुबेहुब COVID-19 सारखेच; चीनमध्ये सापडले आणखी नवे 24 CORONAVIRUS

माणसांना संक्रमित करू शकतात, असे अनेक कोरोनाव्हायरस वटवाघळांमध्ये असू शकतात, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

 • Share this:
  बीजिंग, 12 जून : कोरोनाव्हायरची (Coronavirus) उत्पत्ती कुठून झाली, याचा शोध अद्याप सुरूच आहे. सध्या तरी संशयाची सुई चीनकडेच आहे. याचदरम्यान चीनमधून एक खळबळजनक बातमी आली आहे. चीनमध्ये (China) आणखी नवे 24 कोरोनाव्हायरस (New coronavirus in china) सापडले आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी 24 कोरोनाव्हायरस शोधल्याचा दावा केला आहे. चीनच्या शान्डोंग युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी युनान प्रांतातील वटवाघळांमधील कोरोनाव्हायरसचा शोध घेतला आहे. मे 2019 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान छोट्या छोट्या जंगलात राहणाऱ्या वटवाघळांचे मलमूत्र आणि तोंडातील नमुनेही घेण्यात आले. शास्त्रज्ञांना वटवाघळांमध्ये 24 प्रकारचे कोरोनाव्हायरस (New coronavirus found in bat) दिसून आले आहेत. या व्हायरसपैकी किती व्हायरस माणसांना संक्रमित करू शकतात, माणसांसाठी धोकादायक ठरू शकतात. याचा अभ्यासही शास्त्रज्ञांनी केला. हे वाचा - Covishield च्या दोन डोसमधील अंतर बदलणं कितपत गरजेचं? वाचा काय सांगतात तज्ज्ञ सीएनएनच्या रिपोर्टनुसार Cell जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात शान्डोंग युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, वेगवेगळ्या प्रजातीच्या वटवाघळांमधून नवे कोरोनाव्हायरस शोधून काढले आहेत. यातील चार व्हायरस SARS-CoV-2 सारखेच आहेत. यापैकी एक व्हायरस हा जेनेटिकदृष्ट्या सार्स-कोव्ह-2 शी खूपच मिळताजुळता आहे, जो सध्या जगभरात थैमान घातलो आहे. फक्त स्पाइक प्रोटिन वगळता हा व्हासरस अगदी तसाच आहे. पेशींशी जोडण्यासाठी त्याची असलेली रचना सारखीच आहे. कोरोनाव्हायरसची ही प्रजाती जेनेटिकदृष्ट्या कोविड-19 व्हायरससारखीच असू शकते. वटवाघळांमध्ये अनेक प्रकारचे कोरोनाव्हायरस असू शकतात, जे माणसांना संक्रमित करू शकतात, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. हे वाचा - कोरोना लशीवरील टॅक्स कायम; तुम्हाला किती बसणार फटका? चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा सर्वात आधी उद्रेक झाला होता. कोरोनाव्हायरस हा चीनच्या मीट मार्केटमधून, वुहान लॅबमधून पसरला अशा दोन थिएरी सांगितल्या जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमने याबाबत चीनमध्ये जाऊन तपासही केला. डब्ल्यूएचओच्या टीमने वुहान लॅब थिएरी नाकारली आहे. पण अमेरिकेसह अनेक देशांना वुहान लॅबमधून कोरोना पसरल्याचा संशय आहे. त्यामुळे कोरोनाच्या उत्पत्तीचा तपास वेगाने कऱण्याची मागणी सध्या आहे. अमेरिकेसह जी-7 देशांनीसुद्धा ही मागणी केली आहे.
  Published by:Priya Lad
  First published: