VIDEO कोरोनाला रोखण्यासाठी नागपूरच्या डॉक्टरने तयार केला ‘सेफ्टी बॉक्स'

VIDEO कोरोनाला रोखण्यासाठी नागपूरच्या डॉक्टरने तयार केला ‘सेफ्टी बॉक्स'

कोरोना संक्रमीत व्यक्तीकडून डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची भीती अधिक असते. त्यावर हा बॉक्स उपाय ठरणार आहे.

  • Share this:

नागपूर 02 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. प्रत्येक देश आपल्या गरजेनुसार त्यावर संशोधन करत आहे. या संशोधनात नागपूरच्या एका तरूण डॉक्टरने भर टाकलीय. त्यांनी 'ब्रॉन्कोस्कोपी सेफ्टी बॉक्स' तयार केलाय. याच्या साह्याने उपचार केल्यास बाधित रुग्णाकडून संक्रमणाचा धोका होतो कमी होतो असा त्यांचा दावा आहे. अशा रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना संक्रमणाचा धोका जास्त असतो. त्यामुळे याचा उपयोग होईल असा दावा हा बॉक्स शोधू काढणारे डॉ. समीर अरबट यांनी केला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करते आहेत. मात्र, कोरोना संक्रमीत व्यक्तीकडून डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची भीती अधिक असते. यावर नागपूरच्या डॉ. समीर अरबट यांनी ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया सोपी करण्यासाठी सेफ्टी बॉक्स तयार केलाय. यामुळं बाधित रुग्णाकडून उपचार करणाऱ्यांना होणार संक्रमणाचा धोका कमी करता येतो.

कोरोना बाधित रुग्णाच्या शिंकेमुळ किंवा खोकल्यामुळं संक्रमणाचा धोका अधिक असतो. हा धोका कमी करण्यासाठी सेफ्टी बॉक्स मध्ये ऑपरेटर अपरेचर लावण्यात आलं आहे. याला प्लास्टिक शीट व्हॉल्वने कव्हर केलंय. याला उघडता आणि बंद करता येतं. यात एक छिद्र सुद्धा आहे. यामुळं कोरोना बाधित रुग्णाची श्वशन प्रकिया थांबली तरी ते काम करते. 'इटालीयन सोसायटी ऑफ हॉस्पिटल पल्मोनोलॉजी' मध्ये या सिक्युरिटी बॉक्सचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार असल्याचं डॉ. समीर अरबट यांनी सांगितलंय.

अमेरिकेतही कोरोनावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू असून त्याचे अनेक अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. कोरोनातून रूग्ण बरा होण्याचं प्रमाणही मोठं आहे. आत्तापर्यंत 2 लाखांपर्यंत रूग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर 10 लाख लोकांना लागण झाली आहे. तर जगभरात 47 हजार लोकांचा मृत्यू झालाय.

सावध राहा! कोरोनाला रोखण्यासाठी PM मोदींनी केल्या या 11 सूचना

कोरोनातून रूग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या शरीरात व्हायरस असतो की तो जातो असा प्रश्न विचारला जातो. अमेरिकेतल्या काही संशोधनांमध्ये त्यावर निष्कर्ष काढण्यात आले आहेत. रूग्ण बरा झाल्यानंतरही फक्त 14 दिवसच क्लारंटाइन राहणं योग्य नाही. कारण त्यानंतर किमान 7 दिवस हा व्हायरस शरीरात राहू शकतो.

रुग्णालयातून पळून घरी गेला कोरोना रुग्ण; पत्नी, मुलींसह 12 लोकांना झाली लागण

त्यामुळे त्यानंतरही काही काळ त्या रूग्णाने सोशल डिस्टन्सिंग पाळल्यास कोरोनाचा धोका कमी होतो असं म्हटलं आहे. या काळात मात्र व्हायरसचा जोर पहिल्यासारखा राहात नाही. तो निष्क्रिय राहतो. कारण त्या काळात त्या माणसाची प्रतिकारशक्ती वाढते असंही नव्या संशोधनात म्हटलं आहे.

First published: April 2, 2020, 4:49 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या