मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Covid Vaccination: केवळ 2 दिवसात 2.45 कोटी जणांचं रजिस्ट्रेशन, मात्र अनेक राज्यांत लसीचा तुटवडा

Covid Vaccination: केवळ 2 दिवसात 2.45 कोटी जणांचं रजिस्ट्रेशन, मात्र अनेक राज्यांत लसीचा तुटवडा

कसं शोधाल व्हॅक्सीनेशन सेंटर ?

कसं शोधाल व्हॅक्सीनेशन सेंटर ?

देशात 1 मेपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला (Third Phase of Covid 19 Vaccination) सुरुवात होणार आहे. यासाठी आतापर्यंत 2.45 कोटी जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.

नवी दिल्ली 30 एप्रिल : देशात 1 मेपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला (Third Phase of Covid 19 Vaccination) सुरुवात होणार आहे. 18 ते 44 या वयोगटातील लोकांना या टप्प्यात लस मिळणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया बुधवार म्हणजेच 28 एप्रिल 2021 पासून सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार आता 18 वर्षावरील सर्वांना कोरोना लस घेता येणार आहे. कोविन (CoWIN) आणि आरोग्य सेतूच्या माध्यमातून कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन (Covid-19 Vaccine online Registration) करता येणार आहे.

28 एप्रिलपासून रजिस्ट्रेशनला सुरुवात होताच मोठ्या प्रमाणात नोंदणीला सुरुवात झाली आहे. अठरा वर्षांवरील नागरिक या दोन्ही अॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नावनोंदणी करत असल्याचं दिसत आहे. केवळ दोन दिवसांमध्येच 2.45 कोटी जणांची या अॅपच्या माध्यमातून नावनोंदणी केली आहे.

किती लोकांनी केली नोंदणी -

28 एप्रिल 2021- 1.37 कोटी

29 एप्रिल 2021 - 1.04 कोटी

30 एप्रिल 2021 - सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 4.38 लाख

लसीकरणासाठी जे लोक सध्या नोंदणी करत आहेत, त्यांनी लसीकरणासाठीची वेळ मिळत नाहीये. आरोग्य सेतू अॅपनं ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे, की अठरा वर्षावरील लोकांना लसीकरणासाठीची वेळ तेव्हाच मिळेल जेव्हा राज्यात लसीकरणाला सुरुवात होईल. देशात कोरोनाचा प्रसार झपाट्यानं वाढत आहे, अशात लसीकरण जलद गतीनं होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र, या परिस्थितीत देशात लसीचाही तुटवडा आहे. याच कारणामुले महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड यासारख्या काही राज्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे, की लसीचा तुटवडा असल्यानं ते १ मेपासून लसीकरणाला सुरुवात करू शकणार नाहीत.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine in market