Home /News /coronavirus-latest-news /

भाजपमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, ममता बॅनर्जींचा आरोप

भाजपमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, ममता बॅनर्जींचा आरोप

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. याच दरम्यान तेथे कोरोना बाधितांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे.

    जलपाईगुडी, 14 एप्रिल: पश्चिम बंगाल (West Bengal)मध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कोरोना (Coronavirus) बाधितांच्या संख्येतही वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी भाजप (BJP)वर आरोप केला आहे. भाजपने प्रचारासाठी बाहेरील राज्यांतून माणसं आणल्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. एका प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर आरोप केला की, लसीकरणासंदर्भातील अनेक राज्यांच्या विनंतीला केंद्र सरकार प्रतिसाद देत नाही. नागरिकांचे लसीकरण केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. काही दिवसांपूर्वी आम्ही कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र, भाजपने पश्चिम बंगालमध्ये प्रचार करण्यासाठी बाहेरील राज्यांतून माणसं बोलावली होती आणि त्यामुळे येथील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे. गेल्या 24 तासांत पश्चिम बंगालमध्ये 20 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वर्षातील ही आतापर्यंतची सर्वोच्च नोंद आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येतही वेगाने वाढ होत आहे. वाचा : Covid 2nd Wave: भारतात एका दिवसात 3 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होऊ शकते, तज्ञांचा दावा मंगळवारी (13 एप्रिल 2021) पश्चिम बंगालमध्ये 4,817 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली होती. यामुळे पश्चिम बंगालमध्ये बाधितांची एकूण संख्या 6,24,224 इतकी झाली आहे. पश्चिम बंगालमधील आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एकूण 42,214 नमुन्यांची तपासणी केली त्यापैकी 4,817 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. याचवेळी 2,278 बाधितांनी कोरोनावर मात केली. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 5,84,740 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Coronavirus, Mamata banerjee

    पुढील बातम्या