नवी दिल्ली, 14 एप्रिल: एका टॉपच्या वायरोलॉजिस्ट (Virologist) म्हणजेच विषाणूशास्त्रज्ञांच्या मते, भारतात सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून (Corona 2nd wave) नागरिकांना दिलासा मिळण्यास आणखी वेळ लागले. विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांच्या मते, कोरोनाची दुसरी लाट ही भारतात मे महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहू शकते. इतकेच नाही तर एका दिवसात तब्बल 3 लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होऊ शकते. बुधवारी भारतात तब्बल 184372 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी अवघ्या 24 तासांतीलच आहे. डॉ. जमील यांन न्यूज 18 सोबत बोलताना म्हटलं, नव्या बाधितांच्या संख्येत ज्या वेगाने वाढ होत आहे ते चित्र खूपच भयावह आहे. जर तुम्ही सक्रिय केसेच्या ग्रोथकडे पाहिलं तर दररोज जवळपास 7 टक्क्यांनी वाढ होत आहे. ही वाढ खूपच जास्त आहे. जर ही वाढ अशीच कायम राहिली तर येत्या काही दिवसात एका दिवसाला 3 लाख रुग्णांची नोंद होऊ शकते. असा अंदाज इतरांनीही वर्तवला आहे. विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती बिकट करोना बाधितांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे भारताने एकूण बाधितांच्या संख्येत ब्राझिलला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या अमेरिकेत नोंद झाली आहे. विषाणूच्या नव्या स्ट्रेन्समुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. डॉ. जमील यांनी सांगितले की, नवीन स्ट्रेन नक्कीच जास्त संसर्गजन्य आहेत पण त्यातून होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी माहिती नाहिये. भारतातील लसींच्या तुटवड्यांचं वृत्त त्यांनी फेटाळून लावलं आहे. वाचा: Corona Cases in India: कोरोनाची दुसरी लाट बनली आणखी घातक; महाराष्ट्रासह या राज्यांची चिंता वाढली भारतात लसींचा तुटवडा नाही केवळ सीरम इन्स्टिट्यूट एका महिन्यात 5 ते 6 कोटी डोस तयार करु शकते. अशाच प्रकारे भारत-बायोटेक 2 ते तीन कोटी डोस बनवू शकते. जर सार्वजनिक डेटा पाहिला तर भारताच्या या दोन कंपन्यांनी आतापर्यंत 31 ते 32 कोटी डोस तयार केले आहेत. ज्यापैकी भारतात आतापर्यंत 12 कोटी डोस वापरण्यात आले आहेत. तर 65 लाख डोस बाहेर पाठवण्यात आले आहेत. म्हणजेच अद्यापही 10 कोटी डोस शिल्लक असावेत. त्यामुळे लसींचा तुटवडा दिसत नाहीये तर ही लॉजिस्टिक समस्या असू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.