मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /BREAKING : महाराष्ट्र होणार मास्कमुक्त? ठाकरे उचलणार मोठे पाऊल

BREAKING : महाराष्ट्र होणार मास्कमुक्त? ठाकरे उचलणार मोठे पाऊल


आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या  बैठकीत मास्क संदर्भात चर्चा झाली.

आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मास्क संदर्भात चर्चा झाली.

आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मास्क संदर्भात चर्चा झाली.

मुंबई, 27 जानेवारी : राज्यात कोरोनाची (corona) तिसरी लाट धडकली आहे. पण महिन्याअखेरीस कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आतापर्यंत मास्क (mask) हे अत्यंत प्रभावी शस्त्र ठरले आहे. पण आता कोरोनाची लाट पाहता राज्य मास्कमुक्त करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. (Maharashtra to be mask free )

आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या  बैठकीत मास्क संदर्भात चर्चा झाली. युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मास्क न वापरण्यासंदर्भात भूमिका घेतलेली असताना आपणही भूमिका घेणार का? अशी चर्चा मंत्रिमंडळात झाली. राज्यात मास्क वापरणे आता गरजेचे नसणार अशी चर्चा यावेळी झाली.  मास्क संदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण होणार आहे.

महाराष्ट्रातील कोविड १९ संसर्गाची परीस्थिती आणि संभाव्य असलेल्या चौथी आणि पाचव्या लाटेची शक्यता आहे. या सर्वांचा सखोल अभ्यास करूनच राज्य सरकार निर्णय घेणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल सादर. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्यास मान्यता. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

- फोर्ट, मुंबई येथील सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील जागा मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यालयीन वापरासाठी भाडेतत्वावर उपलब्ध करण्यास मान्यता. (विधि व न्याय विभाग)

- सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ इन शॉप या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा निर्णय. (राज्य उत्पादन शुल्क विभाग)

- राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या आस्थापनेवरील चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार विषयातील कंत्राटी तत्वावर नियुक्तीबाबतच्या तरतुदींत सुधारणा करण्याचा निर्णय. प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक संवर्गातील अध्यापकांच्या मानधनात वाढ करणार. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

- मुंबई येथील शासकीय विधि महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती अस्मिता वैद्य यांची पूर्वीची अशासकीय महाविद्यालयातील सेवा विचारात घेऊन त्यांचे वेतन संरक्षित करण्यास कार्योत्तर मंजुरी. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

First published:

Tags: Mask