मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Vaccination: महाराष्ट्रात 4.5 तर UP मध्ये 9 पटींनी वाढवावा लागेल लसीकरणाचा वेग, तरच डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल लक्ष्य

Vaccination: महाराष्ट्रात 4.5 तर UP मध्ये 9 पटींनी वाढवावा लागेल लसीकरणाचा वेग, तरच डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल लक्ष्य

Vaccination in India: भारतात या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील पूर्ण लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. हे लक्ष्य पूर्ण करायचं असेल तर देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशमध्ये लसीकरण 9 पटीनं  वाढवण्याची गरज आहे

Vaccination in India: भारतात या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील पूर्ण लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. हे लक्ष्य पूर्ण करायचं असेल तर देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशमध्ये लसीकरण 9 पटीनं वाढवण्याची गरज आहे

Vaccination in India: भारतात या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील पूर्ण लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. हे लक्ष्य पूर्ण करायचं असेल तर देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशमध्ये लसीकरण 9 पटीनं वाढवण्याची गरज आहे

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 09 जून: देशात 16 जानेवारीपासून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण (Coronavirus vaccination) मोहिमेला सुरुवात झाली. गेल्या पाच महिन्यात देशभरात 20 कोटी 90 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, मात्र गेल्या 2 महिन्यांपासून लसीचा तुटवडा निर्माण झाल्यानं लसीकरणाचा वेग मंदावला आहे. भारतात सध्या कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि कोव्हिशिल्ड (Covisheild) लशी नागरिकांना दिल्या जात आहेत. रशियाच्या स्पुटनिक लसीला (Sputnik V) भारत सरकारने मान्यता दिली असून, जूनअखेरपर्यंत ही लस नागरिकांसाठी उपलब्ध असेल.

भारतात या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील पूर्ण लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. हे लक्ष्य पूर्ण करायचं असेल तर देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशमध्ये लसीकरण 9 पटीनं  वाढवण्याची गरज आहे. तर 18 वर्षांवरील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सहा राज्यांपैकी पाच राज्यांना लसीकरणाचा वेग सध्याच्या वेगापेक्षा पाच पट वाढवावा लागणार आहे. याबाबत मनी कंट्रोलने वृत्त दिलं आहे.

हे वाचा-कोरोना रुग्णांच्या नखांमध्ये होतोय बदल; तुमच्यामध्येही असं लक्षण तर नाही ना?

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, 2021च्या जनगणनेनुसार राज्यातील लोकसंख्या आणि आतापर्यंत झालेलं लसीकरण पाहता उत्तर प्रदेशने गेल्या पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आपल्या एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी 12 टक्क्यांपेक्षा कमी लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. तर, 1.4 लाख दुसरे डोस केवळ एकाच दिवसात 2.5 टक्के लोकांना दिले आहेत. त्यांना त्यांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी दिवसाला 13.2 लाख लोकांचं लसीकरण करावं लागेल. म्हणजेच त्यांना सध्याचा लसीकरणाचा वेग तब्बल 9 पटींनी वाढवावा लागेल.

तर देशातील 18 वर्षांवरील सर्वांत जास्त नागरिक असलेल्या सहा राज्यांपैकी पाच राज्यांना लसीकरणाची दररोजची संख्या 5 पट किंवा त्यापेक्षा जास्त पटीने वाढवावी लागेल. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे.

हे वाचा-भारतात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या खतरनाक स्ट्रेनवर कोरोना लस प्रभावी आहे का?

उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक प्रौढ लोकसंख्या (18 वर्षांवरील नागरिक) असलेलं राज्य महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला देखील 4.5 पटींनी लसीकरण वाढवण्याची गरज आहे. बिहारमध्ये आतापर्यंत 12.6 टक्के लोकांना पहिला आणि 2.5 टक्के लोकांना दुसरा डोस दिला आहे. त्यांना त्याचं दररोजचं लसीकरण 78 हजार डोसवरून वाढवून 6.6 लाखांपर्यंत म्हणजेच तब्बल 8.4 पटींनी वाढवण्याची गरज आहे.

हिमाचल प्रदेशने 38.1 टक्के प्रौढ लोकांचं (Adult Population) लसीकरण केलं असून, 7.9 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस दिलेत. हिमाचल प्रदेशलाही लसीकरण वाढवण्याची गरज आहे. त्यांना दररोजचं लसीकरण सरासरी 18 हजारांवरून वाढवून 41 हजार करावं लागेल. तर केरळ राज्याने आतापर्यंत 31 टक्के लसीकरण पूर्ण केलंय. त्यांनी आतापर्यंत पात्र लोकसंख्येपैकी 8.1 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे. लसीकरणाचं ध्येय डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी केरळला लसीकरण 2.8 पटींनी वाढवण्याची गरज आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine cost, Coronavirus, Vaccine