जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Corona Update रुग्णसंख्येत घट सुरू मात्र मृतांच्या आकड्यात समाधानकारक घट नाहीच, मंगळवारी 477 मृत्यू

Corona Update रुग्णसंख्येत घट सुरू मात्र मृतांच्या आकड्यात समाधानकारक घट नाहीच, मंगळवारी 477 मृत्यू

Corona Update रुग्णसंख्येत घट सुरू मात्र मृतांच्या आकड्यात समाधानकारक घट नाहीच, मंगळवारी 477 मृत्यू

Maharashtra Corona Update राज्यात मंगळवारपर्यंत 54 लाख 31 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं कोरोनाचा रिकव्हरी रेट हा 94.28 एवढा झाला आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा संध्याचा आकडा 2 लाख 30 हजार 681 आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 जून : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर (Corona second wave) मंगळवारपासून पुन्हा एकदा परिस्थिती पूर्वपदावर येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पूर्णपणे अनलॉक केलेलं नसलं तरी ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत दिलासादायक घट आहे तिथं निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. राज्यात मंगळवारी 14 हजारांवर नवे रुग्ण सापडले तर मृतांचा आकडाही मोठा असल्याचं समोर आलं आहे. (Maharashtra corona Update) (वाचा- नगरमध्ये मुलं कोरोनाच्या विळख्यात, आरोग्य विभाग म्हणतं लक्षणीय वाढ नाही ) मंगळवारी समोर आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीचा विचार करता यातून दिलासा आणि चिंता दोन्ही समोर येत आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांचा राज्यातला आकडा 14 हजार 123 वर आला आहे. ही दिलासा देणारी बाब असली तरी कोरोनामुळं झालेल्या मृत्यूचा आकडा चिंता वाढवणारा असाच आहे. मंगळवारी 477 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाल. कोरोना रुग्णांची संख्या घटत असताना मृतांचा आकडा मात्र त्या वेगानं घटत नसल्याचं चित्र आहे. (वाचा- Covishield दोनऐवजी एकच डोस घ्यायचा का? यावर केंद्राचं मोठं स्पष्टीकरण ) मृतांच्या संख्येचा विचार करता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सध्या गंभीर बनल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात 32 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. तर वसई विरार मनपा हद्दीत 31, बीडमध्ये 29, सातारा 28, अहमदनगर 26, रायगड 22, नाशिक 20 या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं प्रशासनाची काळजी वाढली आहे. यातही काही ठिकाणी मनपा हद्दीतील मृतांचे आकडे वेगळे आहे. उदाहरणार्थ नाशिक मनपा हद्दीत 21 मृत्यू झाले आहेत. त्यामुळं मृतांचा आकडा कमी होत नसल्याचं दिसतंय. राज्यात मंगळवारपर्यंत 54 लाख 31 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं कोरोनाचा रिकव्हरी रेट हा 94.28 एवढा झाला आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा संध्याचा आकडा 2 लाख 30 हजार 681 आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात