नवी दिल्ली, 1 जून : कोरोना लसीकरणाची (Corona Vaccination) दोन डोसची पद्धत देशात कायम राहणार असून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज सांगण्यात आले आहे. कोविशिल्ड (Covishield) लस देण्याच्या पद्धतीमध्ये कोणतेही बदल केले गेलेले नाहीत. पहिल्या डोसच्या 12 आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जाईल. कोवॅक्सिन लसीसाठीही पूर्वीचेच नियम लागू राहणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी झालेल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोविशिल्डच्या एका डोसवर कोणताही गैरसमज, गोंधळ असण्याचं कारण नाही. कोविशिल्डचे भारतात दोन डोस आहेत. त्यात कोणताही बदल नसून कोव्हॅक्सिनचेदेखील दोन डोसच आहेत. अद्याप मिक्सिंग लसीकरणाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, ही वैज्ञानिक बाब असून त्यामध्ये काही बदल केल्यास माध्यमांना कळविण्यात येईल, असेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. EXPLAINER: कोरोनाची लस तुम्हाला किती दिवस सुरक्षित ठेवेल? जाणून घ्या काय सांगतात एनआयटीआय आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, देशातील राज्य सरकारे कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तयारी करीत आहेत. तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असल्याचे सांगितले जात असले तरी आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह मुलांमध्ये जास्त लक्षणे दिसून आलेली नाहीत. गंभीर प्रकरणांच्या विशेष नोंदी नाहीत. विषाणूच्या स्वरुपात पुन्हा बदल होऊ लागला तर मात्र मुलांवरील धोका वाढू शकतो. मात्र, खबरदारी म्हणून मुलांसाठी पूर्ण तयारी केली आहे. लक्षणांविषयी त्यांनी सांगितले की, कोविड पॉझिटिव्ह मुलांमध्ये ताप, खोकला, सर्दी, निमोनिया ही लक्षणे दिसू लागली आहेत. मिक्स लसीवर संशोधन व्ही.के. पॉल म्हणाले की, सध्या एकाच व्यक्तीला दोन्ही मिक्स लस देण्याविषयी कोणतेही प्रोटोकॉल नाहीत. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे पूर्वीचे नियम कायम आहेत. दोन डोस देण्याच्या पद्धतीत बदल केलेला नाही. मिक्स लसीविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन चालू असून त्याचे अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे. परंतु, त्याचे हानिकारक परिणाम देखील होऊ शकतात. डॉ. व्हीके पॉल यांनी बाबा रामदेव आणि आयएमडी यांच्यातील वादाच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यास नकार दिला. हे वाचा - चिंताजनक! प्रेग्नन्सीत आईने दिला कोरोनाशी लढा; जन्मानंतर अवघ्या काही तासांतच बाळाला MIS-C चा विळखा देशात पुरेशी लस आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, लसीची कमतरता नाही. जुलैच्या मध्यापर्यंत किंवा ऑगस्टपर्यंत आमच्याकडे पुरेशी लस तयार होईल, जेणेकरुन एका दिवसात एक कोटी लोकांना लस दिली जाईल. ते म्हणाले की, डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशात लसीकरण पूर्ण होईल, असा आमचा विश्वास आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







