• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • कोरोना लशीची कमाल! लस घेताच लकवा मारलेल्या शरीरात हालचाल; पॅरालिसीस झालेल्या रुग्णाचा दावा

कोरोना लशीची कमाल! लस घेताच लकवा मारलेल्या शरीरात हालचाल; पॅरालिसीस झालेल्या रुग्णाचा दावा

कोरोना लशीमुळे चमत्कार झाल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे.

 • Share this:
  भोपाळ, 28 जून : कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोना लसीकरणावर (Corona vaccination) जोर दिला जात आहे. कोरोना लशीचे (Corona vaccine) काही सौम्य दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यामुळे लोक लस घ्यायला घाबरत आहेत. कोरोना लशीच्या सुरक्षतेबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. अशात मध्य प्रदेशमध्ये (Madhya pradesh) एका व्यक्तीने मात्र कोरोना लशीमुळे चमत्कार झाल्याचा दावा केला आहे. त्याने कोरोना लस घेतली आणि अर्ध्या तासात त्याच्या पॅरालिसिस (Paralysis) झालेल्या शरीरात हालचाल झाल्याचं त्याने सांगितलं आहे. मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये राहणारे अब्दुल मजीद खान. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पॅरालिसिसशी लढा देत होते. त्यांच्या चेहऱ्यावरही याचा परिणाम झाला होता. त्यांना नीट बोलता येत नव्हतं. त्यांनी किती तरी उपचार घेतले पण त्याचा त्यांना काही फायदा झाली. पण जे इतके उपचार करूनही शक्य झालं नाही ते एका कोरोना लशीने केलं. कोरोना लस घेतल्यानंतर त्यांचा पॅरालिसिस बरा झाला. हे वाचा - सावध व्हा! 13 वर्षाच्या मुलामध्ये आढळला मेंदूवर परिणाम करणारा कोरोना टीव्ही 9 च्या रिपोर्टनुसार माजिद खान यांना कोविशिल्ड देण्यात आली होती. मजीद खान यांनी सांगितलं की, कोरोना लस घेतल्यानंतर फक्त अर्ध्या तासात त्यांचा आदार बरा झाला. लस घेतल्यानंतर लकवा मारलेल्या त्यांच्या शरीरात हालचाल होऊ लागली. बधीर झालेले अवयव काम करू लागले. कोरोना लस घेतल्यानंतर पॅरालिसीसपासून त्यांना 75  टक्के आराम मिळाला. पॅरालिसीसमुळे त्यांना बोलणंही शक्य होत नव्हतं. पण आता ते नीट बोलू शकत आहेत. बरं झाल्यानंतर त्यांनी सर्वांना कोरोना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना लशीमुळे 10 वर्षांपूर्वीचा आजार 5 दिवसांत गायब दरम्यान ही पहिलीच घटना नाही. याआधीसुद्धा मध्य प्रदेशच्या बडवानीतल्या एका शिक्षकाने कोरोना लस घेतल्यानंतर 10 वर्षांपासून असलेला आजार 5 दिवसांतच गायब झाल्याचा दावा केला होता. काशीराम कनोजे यांना गेल्या दहा वर्षापासून त्यांच्या पायांच्या तळव्यांना खाज येत होती, जळजळ होत होती. यामुळे त्यांना उठणं, बसणं, झोपणंही अशक्य झालं होतं. जमिनीवर ते पाय टेकवूच शकत नव्हते. शाळेतही ते खुर्चीवर पाय ठेवून बसायचे. दहा वर्षांत त्यांनी कित्येक डॉक्टर केले, कित्येक रुग्णालयं ते फिरले. पण काहीच फरक पडला नाही. हे वाचा - डेल्टा प्लस व्हेरिएंटवर कशी कराल मात?, वाचा 62 वर्षीय रुग्णाचा अनुभव आज तकच्या रिपोर्टनुसार, 11 एप्रिलला जामानिया उपआरोग्य केंद्रात त्यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. त्याच्या पाच दिवसांनंतर त्याच्या पायांच्या तळव्यातील जळजळ कमी होऊ लागली आणि हळूहळू पूर्णपणे आराम मिळाला. आपण आपले जुने उपचार पूर्णपणे बंदच ठेवले होते. त्यामुळे कोरोना लशीमुळेच आपला हा आजार गायब झाला असा दावा त्यांनी केला आहे.
  Published by:Priya Lad
  First published: