21 दिवस 2100 बळी; आता भयंकर ठरतोय हा आजार, कोरोनामुक्त रुग्णांना सर्वाधिक धोका

21 दिवस 2100 बळी; आता भयंकर ठरतोय हा आजार, कोरोनामुक्त रुग्णांना सर्वाधिक धोका

गेल्या तीन आठवड्यांत म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या 150 टक्क्यांनी वाढली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून : एकिकडे कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) देशातील आकड्याने धक्काच दिला आहे. देशात म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर (Mucormycosis death) 50% आहे. गेल्या तीन आठवड्यांत या आजाराने 2100 पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. तर 150% प्रकरणं (Mucormycosis cases) वाढून आकडा 31 हजारांच्या पार गेला आहे.

गेल्या तीन आठवड्यांतच देशात 31,216 ब्लॅग फंगस रुग्णांची (Black fungus cases) नोंद झाली आहे तर 2,109 रुग्णांचा मृत्यू (Black fungus death)  झाला आहे. याचा अर्थ दर दिवसाला 100 तर दर तासाला चार रुग्णांचा हा आजार जीव घेतो आहे. ब्लॅक फंगसवरील  Amphotericin-B या औषधाच्या तुटवड्यामुळे हा आकडा वाढत आहे, असं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

हे वाचा - महाराष्ट्राने कोरोनाचे मृत्यू लपवले? आरोग्य विभागाने दिलं 'हे' स्पष्टीकरण

देशातील सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात आहे. राज्यात 7,057 प्रकरणं आणि  609 मृत्यूची नोंद झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि राजस्थानचा क्रमांक लागतो. गुजरात राजस्थानमध्ये अनुक्रमे  5,418, 2,976  रुग्ण आहेत. तर गुजरातमध्ये 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय छत्तीसगड, उत्तर प्रदेशमध्येही बरीच प्रकरणं आहेत.

ब्लॅक फंगस हे गंभीर असं फंगल इन्फेक्शन आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना ही समस्या उद्धवते आहे. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे आणि मधुमेह आहे, अशा रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतर पोस्ट कोविड कॉपम्पिलकेशनमध्ये हा आजार होतो आहे.

हे वाचा - अमेरिकेने मंजुरी नाकारताच भारतीय Covaxin बाबत मोदी सरकारनेही दिली मोठी माहिती

म्युकोरमायकोसिस दुर्मिळ असला, तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती (Immunity) कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात (ICU) असलेल्या, तसंच अवयव प्रत्यारोपण (Transplantation) केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस (Black Fungus) होणं तसंच त्यामुळे त्यांचा मृत्यू होणं अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत. पण कोविड-19 मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे, असं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. कोविड-19 मधून चांगल्या पद्धतीनं बरं होत असलेल्या पेशंट्सना याची लागण होण्यामध्ये अचानक वेगाने वाढ होणं ही काळजीची बाब आहे, असं याआधी सर गंगाराम हॉस्पिटलनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

Published by: Priya Lad
First published: June 11, 2021, 7:02 PM IST

ताज्या बातम्या